Ind vs Ban  sakal
क्रीडा

Ind vs Ban : तब्बल दोन डझन चौकार अन् षटकारांचा दस का दम! इशानने जागेवर उभारून ठोकले दिडशतक

Kiran Mahanavar

Ind vs Ban 3rd ODI LIVE: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज, शनिवारी 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. इशान किशनचे द्विशतक आणि त्यानंतर विराट कोहलीच्या 72व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन तीन धावा करून बाद झाला. यानंतर इशान किशन आणि विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी 290 धावांची भागीदारी झाली. किशन 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 210 धावा करून बाद झाला. त्याचवेळी विराटने 91 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या.

एका टप्प्यावर भारत 450 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते, परंतु हे दोन्ही फलंदाज बाद झाले आणि इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यामुळे टीम इंडियाला अखेरपर्यंत आठ गडी गमावून केवळ 409 धावाच करता आल्या.

श्रेयस अय्यरने तीन, लोकेश राहुलने आठ, शार्दुल ठाकूरने तीन आणि कुलदीप यादवने तीन धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 37 आणि अक्षर पटेलने 20 धावा करत भारताची धावसंख्या 400 च्या पुढे नेली. बांगलादेशकडून तस्किन अहमद, इबादत हुसेन, शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT