Ind vs Ban Instagram celebrity will get a free ticket for the match in Pune Rohit Pawar video viral  
क्रीडा

Ind vs Ban : Instagram सेलिब्रिटीला मिळणार पुण्यातील मॅचचं 'फ्री' तिकीट, अट फक्त एकच... रोहित पवारांचा व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Pune Match Tickets : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ आज (19 ऑक्टोबर) पुण्याच्या मैदानात विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुपारी 2.00 वाजता सुरू होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणे व्हायरल होत आहे.

27 वर्षांनंतर पुण्यामध्ये वर्ल्ड कपचा सामना खेळला जाणार आहेत. मात्र, ऑनलाइन तिकीट मिळत नसल्याने क्रिकेट चाहते गहुंजे स्टेडियमच्या परिसरात गर्दी करत आहेत. पण सामन्याच्या एक दिवस आधी रोहित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये इंस्टाग्राम सेलिब्रिटींनी पुण्यातील मॅचचं 'फ्री' तिकीट मिळणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे. मात्र, त्यासाठी फक्त एक अट घालण्यात आली आहे.

त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये रोहित पवार म्हणाले की, इंस्टाग्राम रील्सला जर तुम्हाला वीस लाखाच्या वर व्ह्यूज असतील. तर त्याला तिकीट फ्री द्यायचे जबाबदारी आमची. रोहित पवारांचा हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर यंदा वर्ल्ड कपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना आज भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये रंगणार आहे. त्यानंतर इतर सामने खेळवले जाणार आहेत. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे.

येथे संपूर्ण सामन्यात धावा करणे खूप सोपे आहे. या खेळपट्टीवर सामान्य उसळी आणि वेग आहे, त्यामुळे मोठे फटके सहज मारता येतात. आणि मैदानही खूपच लहान आहे, त्यामुळे फिरकी गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT