KL-Rahul-Rohit-Sharma 
क्रीडा

IND vs ENG: रोहित-राहुलचा धमाका! 4 वर्षांनी केली खास कामगिरी

IND vs ENG: राहुल-रोहितचा धमाका! 4 वर्षांनी केली खास कामगिरी राहुल-रोहित जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घेतला समाचार Ind vs Eng 2nd Test at Lords Rohit Sharma KL Rahul scores century partnership first time after 2017 for Team India at Foreign Soil creates Record vjb 91

विराज भागवत

राहुल-रोहित जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घेतला समाचार

Ind vs Eng 2nd Test: इंग्लंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय सलामीवीरांनी इंग्लंडच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून शतकी सलामी दिली. रोहितने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला तर राहुलने संयमी खेळी केली. या दोघांनी शतकी भागीदारी करत एक दमदार पराक्रम केला.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी ३३व्या षटकात भारतीय संघाला शतक गाठून दिलं. रोहित-राहुल जोडीने भारतासाठी शतकी सलामी देत अतिशय खास अशी कामगिरी केली. भारतीय संघाकडून २०१७नंतर कोणत्याही सलामी जोडीला शतकी भागीदारी करता आली नव्हती. पहिल्या कसोटीत राहुल-रोहित जोडीने ९७ धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर रोहितला बाद व्हावे लागले. या सामन्याच्या पहिल्या डावात मात्र या दोघांनी अप्रतिम खेळ केला आणि तब्बल चार वर्षांनी परदेशी जमिनीवर शतकी कसोटी सलामी देण्याची खास कामगिरी केली.

रोहितचं इंग्लंडमधलं पहिलंवहिलं अर्धशतक

रोहित शर्माने डावाच्या सुरुवातीपासून खराब चेंडूवर फटकेबाजी करण्याचा पवित्रा घेतला होता. चांगला किंवा स्विंग येणारा चेंडू आला तर तो सोडून द्यायचा पण खराब चेंडू आला तर त्यावर नक्कीच चौकार खेचायचा अशी त्याची भूमिका होती. त्यामुळे रोहितला इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेता आला. पावसाचा व्यत्यय आला तरीही रोहितने चांगला खेळ सुरूच ठेवला आणि कसोटी क्रिकेटमधील आपले १३वे अर्धशतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम रोहितने पहिल्यांदजाच केला. रोहित गेल्या काही सामन्यात ३० पेक्षा जास्त धावा करत होता पण त्याला अर्धशतक ठोकणे शक्य होत नव्हते. या सामन्यात मात्र त्याने हा पराक्रम करून दाखवला. त्याने ८३ चेंडूत ८ चौकारांसह अर्धशतक ठोकले.

भारताचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज

इंग्लंडच्या संघात तीन महत्त्वाचे बदल

अनुभवी फिरकीपटू मोईन अली आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड या दोघांना संधी मिळाली. त्यासोबतच नवख्या हसीब हमीद यालाही स्थान मिळाले. डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक क्रॉली या तिघांना संघाबाहेर ठेवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT