IND vs ENG Twittter
क्रीडा

IND vs ENG Live Streaming: कधी अन् कुठे पाहाल तिसरी कसोटी?

विराज भागवत

भारतीय संघ कसोटी मालिकेत १-०ने आघाडीवर

Ind vs Eng 3rd Test: इंग्लंड दौऱ्याच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी (IND vs ENG) पावसामुळे अनिर्णित (Draw Test) राहिली. त्यानंतर भारतीय संघाने दुसरी कसोटी १५१ धावांनी जिंकला. इंग्लंडकडून (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) एकाकी झुंज दिली. पण भारताकडून (Team India) मात्र सर्व खेळाडूंना खास खेळी केली. लय सापडत नसलेले (Out Of Form) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनाही पहिल्या डावात सूर गवसला. आता तिसरी कसोटी लीड्सच्या मैदानावर आजपासून सुरू होणार आहे. ही कसोटी कुठे, कधी आणि कशी पाहता येईल याबद्दल जाणून घेऊया...

भारत-इंग्लंड तिसरी कसोटी कुठे आणि किती वाजता सुरू होईल?

मालिकेतील भारत आणि इंग्लंडदरम्यानची तिसरा कसोटी सामना दुपारी ३.३० ला सुरू होईल. हेडिंग्ले, लीड्स येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे.

कोणत्या वाहिनीवर दिसेल हा सामना?

इंग्लंड-भारत तिसऱ्या कसोटी लाईव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ या दोन वाहिन्यांवर होणार आहे. या दोन्ही वाहिन्यांच्या HD चॅनेल्सवरही हा सामना दिसेल.

टीव्हीसमोर नसताना किंवा प्रवासात असाल तर ऑनलाईन कुठे पाहाल सामना?

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचे थेट प्रसारण हे सोनीलिव्ह (SonyLIV) या अँपवरही पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया संघात बदल करेल?

भारतीय संघाची सलामी जोडी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सध्या चांगल्या लयीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी पृथ्वी शॉ ला संघात स्थान मिळणे कठीण आहे. याशिवाय, पहिल्या दोन डावात अयशस्वी ठरलेले विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या तिघांनीही दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आपली लय पकडल्याने सूर्यकुमारला संघात स्थान मिळणे कठीण आहे. भारताच्या गोलंदाजांची फळी अतिशय शिस्तबद्ध मारा करत असल्याने दुखापत झाली तरच एखादा खेळाडू संघाबाहेर होऊ शकेल, अन्यथा त्यात बदल केला जाणार नाही. राहता राहिला प्रश्न अष्टपैलू रविंद्र जाडेजाचा.. जाडेजाने आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी किंवा गोलंदाजी केलेली नसली तरी त्याने संघासाठी महत्त्वाच्या वेळी चांगल्या संधी निर्माण केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ मागच्या सामन्यातील ११ जणांसह मैदानावर उतरेल अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT