India vs New Zealand, 1st Test Day 1 Sakal
क्रीडा

VIDEO : शुबमन गिल भारी खेळत होता; पण...

दोन्ही सलामीवीरांना कायले जेमिसनने तंबूत धाडले

सुशांत जाधव

दोन्ही सलामीवीरांना कायले जेमिसनने तंबूत धाडले

India vs New Zealand, 1st Test : कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावातील आठव्या षटकात कायले जेमिसन याने मयंक अग्रवालची विकेट घेत कर्णधाराचा निर्णय व्यर्थ ठरवला. त्यानंतर मात्र शुबमन गिलनं पुजाराच्या साथीनं संघाचा डाव सावरला.

शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. उपहारानंतर मात्र पुन्हा एकदा कायले जेमिसनने टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का दिला. अर्धशतक पूर्ण करणाऱ्या शुबमन गिलला त्याने बोल्ड केलं. पहिल्या सत्रात टीम इंडियाला दणका देणाऱ्या जेमीसनने दुसऱ्या सत्रातही कमालीची सुरुवात केली. उपहारानंतर डाव सुरु झाल्यानंतर पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने शुबमनला बाद केले. जेमिसनने टाकलेला सुंदर चेंडू शुबमनची बॅटची कड घेऊन यष्टीवर आदळला. आणि जबरदस्त खेळत असलेल्या शुबमनचा खेळ खल्लास झाला.

तत्पूर्व शुबमन गिलने 93 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील अर्धशतकासह त्याने कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक साजरे केले. कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन अद्याप आपल्या पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे. नववा कसोटी सामना खेळणाऱ्या शुभमनने कसोटी कारकिर्दीत 91 ही सर्वाच्च धावसंख्या साकारली आहे.

कमालीचा योगायोग

कायले जेमिसन आणि शुबमन गिल यांच्यात कमालीचा योगयोग सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. दोघांचाही हा नववा कसोटी सामना आहे. कायले जेमिसनने न्यूझीलंडला दमदार सुरुवात करुन दिली. दुसरीकडे पहिल्या धक्क्यातून सावरत शुबमन गिलने संघाचा डाव सावरणारी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : मंत्री माणिकराव कोकाटेंवरील अटकेची टांगती तलवार कायम; उच्च न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT