ind vs nz 3rd odi playing xi  
क्रीडा

IND vs NZ: ODIक्रिकेटमध्ये टीम इंडिया होणार 'बादशहा'? तिसऱ्या सामन्यात Playing-11 मध्ये मोठा बदल

अंतिम सामना जिंकून न्यूझीलंडला ‘व्हाइट वॉश’ देण्यासाठी टीम इंडिया सज्ज..

Kiran Mahanavar

IND vs NZ 3rd ODI : भुवनेश्वरमध्ये रविवारी झालेल्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा थरारक सामन्यात पराभव केला, परंतु भारतातच सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला भारतीय संघ धोबीपछाड देत आहे. आज तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना होत असून यात विजय मिळवला आणि निर्भेळ यश मिळवले, तर रोहित शर्माच्या संघाला एकदिवसीय क्रमवारीत अव्वल येण्याची संधी आहे.

तीन सामन्यांची ही मालिका सुरू होण्याअगोदर न्यूझीलंडचा संघ अव्वल होता आणि भारत चौथ्या स्थानावर होता, परंतु पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे भारत तिसऱ्या स्थानावर पोहचला असून न्यूझीलंडचे अव्वल स्थान खालसा झाले आहे.

आता अव्वल स्थानावर असलेले इंग्लंड, दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंड आणि तिसऱ्या क्रमांकावरील भारत या तिघांचे समान 113 गुण झाले आहेत. भारताने आजचा सामना जिंकला तर भारताचे ११४ गुण होतील आणि अव्वल स्थानावर पोहचता येईल; मात्र न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर ते पुन्हा अव्वल येतील.

या वर्षअखेरीस भारतात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे, त्यासाठी अव्वल स्थानाला महत्त्व असेल. याच विश्वकरंडक स्पर्धेची तयारी भारताने सुरू केलेली असून मायदेशात होत असलेल्या या मालिकांमधून प्रयोगही केले जात आहेत.

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका जिंकलेली असल्यामुळे आजच्या सामन्यात काही बदल अपक्षित आहेत. त्यासाठी उम्रान मलिकला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शार्दुल ठाकूरला वगळले जाऊ शकेल किंवा मोहम्मद सिराज आथवा मोहम्मद शमी यापैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात असतील, त्यामुळे त्यांच्यावरचा वर्कलोड अशा प्रकारे कमी केला जाऊ शकतो.

फिरकी गोलंदाजांमध्ये आता बराच काळ राखीव राहिलेल्या युझवेंद्र चहलला आज संधी दिली जाऊ शकते, पण त्यासाठी कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला जागा रिकमी करावी लागेल. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीही करू शकतो, त्यामुळे त्याचे स्थान कायम राहील असे दिसते.

सूर्यकुमार आणि ईशान किशन यांनाही जम बसवता आलेला नाही. दुसऱ्या सामन्यात दोघांनाही फलंदाजीची संधी मिळाली नव्हती, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघात निवड व्हायची असेल तर या दोघांना ठसा उमटवावा लागणारच आहे, कारण के एल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात आले तर सूर्यकुमार आणि ईशान किशन यांना जागा रिकामी करावी लागेल.

रोहित, विराटकडून अपेक्षा

या मालिकेपूर्वी चार सामन्यांत तीन शतके करणाऱ्या विराट कोहलीला गेल्या दोन सामन्यांत चांगल्या धावा करता आलेल्या नाहीत, त्यामुळे आज मोठी खेळी करण्यासाठी त्याचा निर्धार पक्का असेल. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केले, परंतु विजयाचे आव्हान १०९ धावांचेच असल्यामुळे मोठी खेळी करायला वाव नव्हता. आज मात्र रोहितला विराटप्रमाणे मोठ्या खेळीसाठी प्रयत्न करावे लागले. प्रदीर्घ काळ त्याच्याकडून शतकी खेळी झालेली नाही. विराट आणि रोहित दोघेही आजच्या सामन्यानंतर थेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार आहेत, त्यामुळे प्रकार वेगळा असला तरी फॉर्मात येणे हे दोघांसाठी महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT