क्रीडा

Mohammad Shami : "अपना टाइम आएगा..."; न्यूझीलंडचं कंबरडं मोडणाऱ्या शामीनं सांगितला वानखेडेवरचा खास प्लॅन

क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये शानदार खेळी करत न्यूझीलंडला नमवून भारतानं फायनलमध्ये धडक मारली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

IND vs NZ Semi-Final: क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये शानदार खेळी करत न्यूझीलंडला नमवून भारतानं फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाच्या या यशामागे वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीचा सिंहाचा वाटा आहे. तोच आजच्या सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' ही ठरला. पण न्यूझीलंडचं कंबरडं मोडणाऱ्या शामीनं आपल्या या शानदार खेळीमागचा प्लॅन सांगितला आहे. (IND vs NZ Semi Final Mohammad Shami who became man of the mach told plan behind his innings)

अपना टाइम आएगा...

'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्विकारल्यानंतर मोहम्मद शामी समालोचक संजय मांजरेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यानं आपली एक सुप्त इच्छा सहजरित्या बोलून दाखवली. मी आजवर माझी वेळ येण्याचीच वाट पाहत होतो, असं त्यानं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या वर्ल्डकपमध्ये खेळत असता तेव्हा आपल्या सर्वांना अशी संधी पुन्हा कधी मिळेल माहीत नसते. त्यामुळं मला मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. कारण आम्ही 2015 आणि 2019 च्या WC मध्ये आम्ही उपांत्य फेरीत हरलो होतो.

न्यूझीलंडविरोधातली स्ट्रॅटेजी काय?

आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट जास्त खेळलोलो नाही हे सांगताना शामी म्हणाला, पांढऱ्या चेंडूवर मी जास्त क्रिकेट खेळलेलो नव्हतो. माझ्या मनात होतं की आपण यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल यावर भर द्यायला पाहिजे. त्याचबरोबर मी नवीन चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला.

माझ्याकडून केनचा झेल सुटला याचं मला वाईटही वाटलं. त्यानंतर मी वेग घेण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याचे फटके खेळत होता. विकेट चांगली होती, दव पडण्याची भीती होती. खेळपट्टीवरील गवत छान कापलेलं होतं, धावा पुरेशा होत्या.

पण जर दव पडलं असतं तर परिस्थिती बिघडली असती. हळू टाकलेले चेंडू कदाचित काम करत नव्हते. त्यामुळं मलाही आश्चर्यकारक वाटत होतं. पण शेवटी वर्ल्डकप हे एक मोठं व्यासपीठ आहे. त्यामुळं मला मिळालेल्या संधीचा फायदा घेतला पाहिजे असा विचार मनात सुरु होता, असं शामीनं आजच्या खेळीवर बोलताना सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

शामी ठरला सामनावीर

दरम्यान, भारतानं न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचं टार्गेट दिलं होतं. पण ते पूर्ण करताना डॅरेल मिचेलनं १३४ धावांची खेळी केली तर केन विल्यमसननं ६९ धावांची तर ग्लेन फिलिप्स ४१ या तिघांनी चांगली कामगिरी केली. पण डेबॉन कॉनवे याचा पहिला बळी घेतल्यानंतर शमीनं हुशारीनं गोलंदाजी केली.

तसेच गोलंदाजीत अनेक बदल करत ५७ धाव देत एकापाठोपाठ न्यूझीलंडचे ७ बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या संघाचं कंबरडंच मोडलं. त्यामुळं भारतीय संघाला ७० धावांनी विजय मिळवता आला आणि थेट फायनलमध्ये धडक मारली.

शामीनं आजच्या सामन्यात केलेले विक्रम

  1. 57 धावात 7 विकेट्स! वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजीचे आकडे

  2. एका भारतीयाने वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्म शामीच्या नावावर

  3. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम

  4. भारतीय गोलंदाजाकडून वर्ल्डकपमधील सर्वात चांगली बॉलिंग फिगर

  5. वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने 50 विकेट्स घेणार गोलंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT