umran malik rahul dravid 1st t20i 
क्रीडा

राहुल द्रविड घेतोय उमरान मलिकची शाळा, टिप्स देतानाचा VIDEO व्हायरल

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनीही नेट सत्रात घाम गाळला.

Kiran Mahanavar

India vs South Africa Umran Malik: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला टी-20 सामना 9 जून रोजी दिल्लीत खेळला जाईल. त्यासाठी भारतीय संघाने जोरदार सराव सुरू केला आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनीही नेट सत्रात घाम गाळला.

भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान यांच्या उपस्थितीमुळे या दोन्ही युवा खेळाडूंना संघात स्थान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र उमरान मलिक संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत बराच वेळ घालवताना दिसला, दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. उमरानला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे.

आयपीएल 2022 मध्ये चांगला खेळ दाखवल्यानंतर उमरानला भारतीय संघात संधी मिळाली आहे. उमरानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहू. त्याचवेळी आपला आदर्श वकार युनूस नसून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार असल्याचे त्याने म्हटले आहे. या गोलंदाजांकडून तो खूप काही शिकला आहे. केएल राहुल टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. खरे तर या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाला टी-20 मध्ये मोठा विक्रम करण्याची संधी आहे. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना जिंकल्यास सलग 13 सामने जिंकणारा तो पहिला संघ बनेल. भारतीय संघ टी-20 मालिका खेळल्यानंतर इंग्लंडला जाणार आहे, जिथे एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT