Virat Kohli and Mohammed Azharuddin Sakal
क्रीडा

अशावेळी विराटनं ब्रेक घेणं म्हणजे....अझरुद्दीनची बोलकी प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियात रंगलाय सामना

सुशांत जाधव

Team India Tour of South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय संघात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी वनडे संघाची धूरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आली. त्यानंतर दुखापतीमुळे रोहितनं कसोटीतून माघार घेतली. आता विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणास्तव वनडे (ODI) सामन्यातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याने बीसीसीआयकडे (BCCI) सुट्टीची मागणी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) मालिकेपूर्वी टीम इंडियात रंगलेला खेळ हा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात निर्माण झालेली दरी अधोरेखित करणारी आहे, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले आहे.

सोमवारी रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखातप झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्या जागी कसोटी संघात प्रियांक पांचाल याची निवड केली. दुसऱ्या बाजूला कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कौटुंबिक कारणास्तव वनडे खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय क्रिकेटमधील हा घटनाक्रम अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. नेतृत्वात खांदेपालट झाल्यानंतर रोहित आणि विराट यांच्यात पुन्हा एकदा दरी निर्माण झालीये, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin)यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी एका ट्विटच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही, असे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा कसोटी खेळणार नाही. ब्रेक घेण्यास काहीच हरकत नाही. पण टायमिंग थोडं चुकीचे असल्याचे वाटते. या घटना रोहित आणि विराट यांच्यातील अंतर्गत वादाच्या गोष्टीची पुष्टी करणाऱ्या आहेत, असे अझरुद्दीन यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT