Ind VS SA: Virat Kohli Skip the Press Conference
Ind VS SA: Virat Kohli Skip the Press Conference ANI
क्रीडा

SA vs IND : कोहलीची प्रेस कॉन्फरन्सला दांडी; द्रविड म्हणाला...

सुशांत जाधव

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहन्सबर्गच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी रविवारी भारतीय संघाचा मुख्य कोच राहुल द्रविडनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विराट कोहली या प्रेस कॉन्फरन्सला का आला नाही? या बाउन्सरचा द्रविडला यावेळी सामना करावा लागला. पण 'द वॉल' द्रविडनं मैदानात प्रतिस्पर्ध्यानं टाकलेला चेंडू जसा उत्तमपणे डिफेन्स करावा तशी भूमिका घेत कर्णधाराची पाठराखण केली. एवढेच नाही तर तो कधी प्रेस कॉन्फरन्सला दिसेल, याच उत्तरही दिलं. (IND vs SA Team India Head Coach Rahul Dravid on Virat Kohli Skipping Press Conferences)

राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वोच्च दर्जाचा खेळाडू आहे. आजूबाजूला त्याच्यासंदर्भात बरेच काही बोलले जात आहे. या परिस्थितीतही तो कणखरपणे संघासोबत उभा आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी तो नेतृत्वाची उत्तम झलक दाखवून देत आहे. कोहली सातत्याने मेहनत घेत असून त्याच्या भात्यातून आपल्याला लवकर मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. विराट कोहली 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही राहुल द्रविडनं यावेळी दिली.

कोहली, पुजारा (Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinky Rahane) सध्याच्या घडीला मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. या तिघांची द्रविडनं पाठराखण केली. तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळत असता पण ती खेळी तुम्हाला मोठ्या धावसंख्यात रुपांतर करता येत नाही. सर्वांनाच या गोष्टीचा सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे धावा करण्यात ते यशस्वी ठरत आहेत ही महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर कसे करायचे हे त्यांना माहित आहे. लवकरच ते ही झलक दाखवून देतील, असे द्रविडनं म्हटलं आहे.

पुजाराच्या भात्यातून धावा होत नाही हे खरं असलं तरी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याची खराब कामगिरी चिंता करण्याजोगी वाटत नाही. तो ज्या क्रमाकांवर खेळतो त्या ठिकाणी गोलंदाजांचा सामना करणं कठीण आहे. ज्यावेळी तो मोठी खेळी करतो तेव्हा भारतीय संघाचा विजय पक्का असतो, असे म्हणत आगामी सामन्यात पुजाराची मेहनत कामी येईल, असा विश्वास राहुल द्रविडनं व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT