Umran Malik bowls 163.7 kmph  
क्रीडा

नेट प्रॅक्टिसवेळी उमरान मलिकने तोडला रेकॉर्ड? मशीनवर दिसतोय १६३ चा आकडा

उमरान मलिक क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज

Kiran Mahanavar

Umran Malik bowls 163.7 kmph: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार तयार करत आहे. आफ्रिकन संघाला टीम इंडियाविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 9 जूनपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. दरम्यान, वेगवान युवा गोलंदाज उमरान मलिकच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेतून वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे पदार्पण होण्याची शक्यता आहे.

उमरान मलिक आता विश्वविक्रम करायची तयारी करत आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी सराव करत आहे. तर उमरान नेटमध्ये एक-दोन तास गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्यादरम्यान उमरानने 163.7 किमी वेगाने एक चेंडू टाकला आहे. सराव करताना त्यांनी याचाच अर्थ शोएब अख्तरचा विक्रम मोडला आहे. शोएब अख्तरने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात वेगवान 161.3 किमी वेगाने चेंडू टाकला होता.

उमरान मलिक आता सराव करताना 163.7 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 161.3 किमी/तास वेगाने गोलंदाजी केली आहे, तर उमरान मलिक सराव करताना 163.7 किमी/तास वेगाने गोलंदाजी केली आहे. म्हणजेच अख्तरचा हा विक्रम उमरानने आता मागे टाकला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय रेकॉर्डमध्ये सराव करताना केलेला चेंडूचा विचार केला जात नाही. त्यामुळे भविष्यात टीम इंडिया अख्तरचा विक्रम मोडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीने राहुल द्रविडही प्रभावित झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत उमरान खेळणे शक्य आहे. सराव सामन्यादरम्यान गोलंदाजी करत उमरान मलिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शोएब अख्तरच्या नावाचा विश्वविक्रम मोडीत काढण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्किया, वायने पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वेन डेर डूसेन, मार्को जानसेन.

टीम इंडिया: केएल राहुल, ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT