क्रीडा

IND vs SL: 'ते' पाहून द्रविड ड्रेसिंग रूममधून खाली आला अन्...

IND vs SL: 'ते' पाहून द्रविड ड्रेसिंग रूममधून खाली आला अन्... ४४व्या षटकाच्या वेळी घडला हा प्रकार Ind vs SL 2nd ODI Rahul Dravid rushes from India dressing room to dugout to pass on a message for Deepak Chahar photos viral Twitter vjb 91

विराज भागवत

भारतीय संघाने यजमान श्रीलंकेवर ३ गडी राखून विजय मिळवला आणि वन डे मालिकेत २-० ने आघाडी घेतली. श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात २७५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ७ बाद १९३ होती. पण त्यानंतर दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी नाबाद ८४ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. नाबाद अर्धशतक (६९) झळकावणारा दीपक चाहर सामनावीर ठरला. सामन्यानंतर चाहरची चर्चा झालीच पण त्यासोबत चर्चा रंगली ती प्रशिक्षक राहुल द्रविडची. द्रविडने चाहरला कानमंत्र दिला आणि भारत जिंकला. (Ind vs SL 2nd ODI Rahul Dravid rushes from India dressing room to dugout to pass on a message for Deepak Chahar photos viral Twitter)

सहा षटकांचा खेळ शिल्लक असताना दीपक चाहर काही जोखमीचे फटके खेळत असल्याचे राहुल द्रविडला लक्षात आले. शांतपणे खेळ केला तर भारत हा सामना जिंकू शकतो असा द्रविडला विश्वास होता. त्यामुळे द्रविड ड्रेसिंग रूममधून थेट डगआऊटमध्ये आला आणि त्याने दीपक चाहरचा भाऊ राहुल चाहर याला काहीतरी सांगितलं. त्यानंतर ४७व्या षटकात दीपक चाहरला पाणी घेऊन जाणाऱ्या राहुलने द्रविड मास्तरांचा निरोप दीपक पर्यंत पोहोचवला. त्यानंतर दीपक चाहरने संयमी खेळ करत संघाला अविस्मरणीय असा विजय मिळवून दिला.

दरम्यान, श्रीलंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो (५०) आणि चरिथ असालांका (६५) यांनी अर्धशतके ठोकली. चमिका करूणरत्ने (४४) आणि मिनोद भानुका (३२) या दोघांनीही चांगल्या खेळी केल्या. त्यामुळे श्रीलंकेला २७५ धावांचा टप्पा गाठता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची वरची फळी नापास झाली. पण सूर्यकुमार यादवने ५३ धावा करून डावाला थोडेस स्थैर्य दिले. त्यानंतर ७ गडी बाद झालेले असताना भुवनेश्वर कुमारच्या साथीने दीपक चाहरने संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी जवळपास १५ षटके खेळली आणि विजयासाठी आवश्यक ८२ धावा केल्या. दीपक चाहरने ७ चौकार आणि १ षटकार खेचत ८२ चेंडूत ६९ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT