Hardik Pandya esakl
क्रीडा

Hardik Pandya: पराभवानंतर कॅप्टन पांड्याने हे काय केलं ज्यामुळे झाला ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात विजयाने केली. मात्र, दुसऱ्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवर स्विकारावा लागला. या पराभवाला गोलंदाजांना जबाबदार धरले आहे. दरम्यान, कॅप्टन हार्दिक पाडंयाचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे तो तुफान ट्रोल होताना दिसत आहे. (IND vs SL 2nd T20 Hardik Pandya Troll fans social media )

पुण्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 16 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यासह दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या सामन्यानंतर पांड्या नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे.

हेही वाचा: Virat Kohli : विराट कोहली अनुष्कासोबत व्हेकेशनवर, संघाची घोषणा होताच गाठले मुंबई विमानतळ

का होतोय पांड्या ट्रोल?

सामन्याच्या अखेरच्या षटकात अक्षर पटेल आऊट होताच कॅप्टन पांड्या पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सहकारी खेळाडू आणि व्यवस्थापकाशी हातमिळवणी करु लागला. त्याच्या या कृतीतून पांड्याने स्वतःच हार मानली असे चित्र दिसले. त्यामुळे पांड्याचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

उभय संघांमधील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय संघाचा खराब खेळ पाहता, शेवटच्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये बदल करू शकते, असे मानले जात आहे. पण राहुल द्रविड म्हणाला, 'मी तिसऱ्या सामन्याबद्दल विचार केलेला नाही. तिथे गेल्यावर विकेट बघू. पण मला जास्त प्रयोगांची अपेक्षा नाही. जे खेळाडू आधीच खेळत आहेत ते खूप तरुण संघ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : "कमिशनखोरी अन् उन्माद खपवून घेणार नाही"; फडणवीसांचा पुण्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कडक इशारा!

Horoscope : माघ महिना सुरू होताच 5 राशींचे भाग्य बदलणार; होणार धनलाभ, खूप वर्षांपासूनची इच्छा होईल पूर्ण, नोकरी-धंद्यात मिळेल मोठे यश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT