IND VS SL odi shubman gill  
क्रीडा

IND vs NZ: गिलचं द्विशतक अन् गब्बरचं ट्वीट व्हायरल! वाचा नक्की काय म्हणाला...

शिखर धवनचे ट्विट व्हायरल

Kiran Mahanavar

Shikhar Dhawan on Shubman Gill : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात युवा सलामीवीर शुभमन गिलने द्विशतक झळकावून संस्मरणीय खेळी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा यादीतील 8 वा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टिन गप्टिल, फखर जमान, ख्रिस गेल आणि इशान किशन यांनी त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे.

गेल्या एक वर्षापासून शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत आणि टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या जागी स्वत: ला परमनंट केले आहे. या सगळ्याच्या पलीकडे शिखर धवनने शुभमन गिलचे द्विशतकाबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे.

शुभमन गिलच्या विक्रमाबद्दल सलामीवीर शिखर धवनने ट्विटरवर लिहिले की, 'शुबमन गिलचे वनडे मालिकेत द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज बनल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!' त्याच्या या ट्विटवर क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. शुभमन गिलने 23 वर्ष 132 दिवसात ही मोठी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 208 धावांच्या खेळीत त्याने 19 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT