India vs Sri Lanka Ruturaj Gaikwad
India vs Sri Lanka Ruturaj Gaikwad sakal
क्रीडा

IND vs SL: एका ओव्हरमध्ये मारले होते 7 षटकार! मात्र कॅप्टन पांड्याने संपवले करिअर?

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka Ruturaj Gaikwad : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे. श्रीलंकेच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याने जेव्हा प्लेइंग-11 चा उल्लेख केला तेव्हा अनेकांना वाटले की तो त्यात ऋतुराज गायकवाडचा समावेश करेल, पण त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. हार्दिकने संघात कोणताही बदल केला नाही. ऋतुराज संघासोबत आहे पण सलग तिसऱ्या सामन्यात त्याला निराशेचा सामना करावा लागला.

कर्णधार हार्दिकने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत शुभमन गिलला संधी दिली पण तो फलंदाजीत फार काही करू शकला नाही. ओपनिंग करताना त्याने मालिकेतील दोन सामन्यात केवळ 12 धावा केल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात गिलने केवळ 7 धावा केल्या होत्या. या सामन्यातही तो विशेष काही करू शकला नाही आणि 3 चेंडूत अवघ्या 5 धावा करून वाटचाल करत राहिला.

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत एक वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 2021 साली श्रीलंकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत तो शेवटचा टीम इंडियाच्या जर्सीत दिसला होता. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ 19 धावा केल्या आहेत आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एका अर्धशतकासह एकूण 135 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज आक्रमक खेळतो. त्याच्या एकूण टी-20 कारकिर्दीत त्याने 90 सामन्यांमध्ये 133.36 च्या स्ट्राइक रेटने एकूण 2836 धावा केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने एका षटकात सात षटकार मारून इतिहास रचला आहे. ऋतुराजने एका षटकात एकूण 43 धावा केल्या, हाही एक नवा विश्वविक्रम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT