ind vs sl sri lanka tour of india full schedule of t20 and odi series know here in details cricket news marathi kgm00
ind vs sl sri lanka tour of india full schedule of t20 and odi series know here in details cricket news marathi kgm00  
क्रीडा

IND vs SL: नवीन वर्ष नवा कर्णधार! जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्वकाही...

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka Schedule 2023 : टीम इंडिया 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळून करणार आहे. या कालावधीत शेजारी देशाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेव्यतिरिक्त एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.

भारताला श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 13 दिवसांत एकूण 6 सामने खेळायचे आहेत. दुसरा टी-20 सामना 5 जानेवारीला पुण्यात तर मालिकेतील शेवटचा सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाला तर पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारीला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे, तर पुढील दोन सामने कोलकाता आणि तिरुअनंतपुरम येथे 12 आणि 15 जानेवारीला होतील. या मालिकेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या वनडे आणि टी-20 संघांची घोषणा करण्यात आली आहे.(sri lanka tour of india full schedule of t20 and odi series )

भारत विरुद्ध श्रीलंका 2023 पूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी-20 सामना - 3 जानेवारी 2023 (मंगळवार) - मुंबई - संध्याकाळी 7

  • दुसरा टी-20 सामना - 5 जानेवारी 2023 (गुरुवार) - पुणे - संध्याकाळी 7

  • तिसरा टी-20 सामना - 7 जानेवारी 2023 (शनिवार) - राजकोट - संध्याकाळी 7 वाजता

  • पहिला एकदिवसीय सामना - 10 जानेवारी 2023 (मंगळवार) - गुवाहाटी - दुपारी 2 वा.

  • दुसरा एकदिवसीय सामना - 12 जानेवारी 2023 (गुरुवार) - कोलकाता - दुपारी २

  • तिसरा एकदिवसीय सामना - 15 जानेवारी 2023 (रविवार) - तिरुवनंतपुरम - दुपारी 2 वा.

ODI साठी श्रीलंकन संघ : दासून शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांजो, सादीरा समरविक्रमा, कुशल मेंडिस, चरिख असालंका, धनंजय डिसिल्वा, अशीन बंदारा, महीश तिक्शाना, जेफरी वांदेरसाय, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कासूम रजिता, नुवानिदू फर्नांडो, दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशान, लाहिरू कुमारा.

टी-20 साठी श्रीलंकन संघ - दासून शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांजो, सादीरा समरविक्रमा, भानुका राजपक्षा, वानिंदू हसरंगा, नुवान तुषारा, चरिख असालंका, धनंजय डिसिल्वा, , अशीन बंदारा, महीश तिक्शाना, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कासूम रजिता, दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशान, लाहिरू कुमारा.

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवला आहे. हार्दिकने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले आहे. या मालिकेत टीम इंडियाने किवी संघाचा 1-0 असा पराभव केला. टी-20 वर्ल्ड कपपासूनच हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.

भारतीय टी-20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

भारतीय एकदिवसीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT