rohit sharma ind vs wi odi 
क्रीडा

WI vs IND 2nd ODI : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय! 'त्या' फ्लॉप खेळाडूचा पत्ता कट, 'या' दिग्गजला देणार संधी?

Kiran Mahanavar

India vs West Indies 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच विकेट्सने पराभव केली. पण या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. मालिकेतील पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या खेळाडूला या सामन्यात बाहेर बसावे लागू शकते.

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना बार्बाडोसमध्येच खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली फलंदाजीसाठी आला नाही. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादवला पाठवण्यात आले. मात्र या संधीचा फायदा उठवण्यात सूर्यकुमार यादव अपयशी ठरला. या सामन्यात तो 19 धावा काढून बाद झाला. त्याची खराब कामगिरी पाहता दुसऱ्या वनडेत मोठा बदल पाहायला मिळु शकतो. सूर्यकुमार यादव आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 24 एकदिवसीय सामन्यांच्या 22 डावांमध्ये 23.79 च्या खराब सरासरीने 452 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके झळकली. गेल्या 11 डावांमध्ये सूर्यकुमार यादवला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

सूर्यकुमार यादवच्या जागी दुसऱ्या वनडेत यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. संजू सॅमसनने टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 11 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 66 च्या सरासरीने आणि 104.76 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत सूर्यकुमार यादव यांच्या जागी ते सर्वात मोठे दावेदार आहेत.

दुसऱ्या वनडेसाठी भारताच्या संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT