West Indies announce squad for 1st Test sakal
क्रीडा

IND vs WI 2nd Test Playing XI: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार, कोणाला मिळणार डच्चू?

Kiran Mahanavar

IND vs WI 2nd Test Playing XI : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथे आता कसोटी मालिका खेळल्या जात आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. पण अजून एक सामना बाकी आहे, जो 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जाईल.

भारतीय संघाने याआधी सामन्यात जी कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. हा सामना तीन दिवसांत संपेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. दरम्यान, भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असला तरी दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर जास्त नसेल तर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून किमान एक किंवा दोन खेळाडू बाहेर जाऊ शकतात.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करणारी असली, तरी वेगवान गोलंदाज फार काही करू शकले नाहीत, पण जयदेव उनाडकटला त्याच्या गोलंदाजीने फारशी छाप पाडता आली नाही. सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने जयदेव उनाडकटला फक्त 7 षटके टाकायला दिली आणि 17 धावांत एकही बळी घेता आला नाही. तर दुसऱ्या डावात कर्णधाराने त्याला फक्त दोन षटके करायला लावली आणि त्यात त्याने एक धाव दिली.

यानंतर अश्विनने इतकी चांगली गोलंदाजी केली की इतर कोणाची गरजच भासली नाही. या संथ खेळपट्टीवर बाकीचे वेगवान गोलंदाज काही करू शकले नाहीत, असे नाही. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी पहिल्या डावात प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या डावातही सिराजने एक विकेट घेतली. पण शार्दुलला गोलंदाजी मिळाली नाही. अशा स्थितीत जयदेव उनाडकटकडे असलेल्या अफाट अनुभवाचा काही उपयोग झाला नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आता जयदेव उनाडकटला दुसऱ्या कसोटी सामन्यात बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन दावेदार प्रबळ आहेत. पहिला मुकेश कुमार आणि दुसरा नवदीप सैनी. मुकेश कुमारला अजून कसोटी पदार्पण करायचे आहे आणि तो असा खेळाडू आहे जो केवळ कसोटीचाच नाही तर एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचाही भाग आहे.

पहिल्या कसोटीत मुकेश कुमारला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते असे मानले जात होते, परंतु यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांच्या पदार्पणामुळे त्याला संधी मिळाली नसावी. मुकेश कुमारचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे, त्यामुळेच त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनबाबत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT