Virat Kohli And Rohit Sharma Viral Photo Sakal
क्रीडा

तुमची झलक 'श्रीवल्ली'...BCCI लाही भावली!

सुशांत जाधव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामने जिंकत भारतीय संघाने रुबाबाबत विजय नोंदवला. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक अर्धशतक झळकावले. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खेळणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli)कामगिरी खराब राहिली. 2015 नंतर पहिल्यांदाच किंग कोहली एखाद्या वनडे मालिकेत अर्धशतकही करु शकला नाही.

भारत-वेस्ट इंडीज (IND vs WI)यांच्यातील मालिका या दोघांच्यातील जोडी कशी जमणार? या प्रश्नाचं उत्तर देणारी होती. आणि त्याचे उत्तरही दिलासादायक मिळाले. दोघांमध्ये दुराव्याच्या चर्चा रंगत असताना मैदानात दोघांनी 'हम साथ साथ है'ची झलक दाखवून दिली. तिसऱ्या वनडेतील एक खास फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पुष्पा चित्रपटातील तुझी झलक श्रीवल्ली...या मराठी व्हर्जनलाही मागे टाकणारी अशीच आहे.

बीसीसीआयलाही (BCCI) या जोडीची झलक चांगलीच भावली आहे. BCCI ने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन दोघांचा स्लिपमध्ये फिल्डिंग करतानाचा खास फोटो शेअर केलाय. याआधीही या दोघांमध्ये ऑल इज वेल ची झलक दाखवणारी छबी बीसीसीआयने शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.

विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने मोठा डाव खेळला आणि टी-20 सह वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या खांद्यावर दिले. ज्यावेळी विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडले होते त्यावेळी वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करण्यास काहीच अडचण नाही हे स्पष्ट केले होते. पण गणित उलटी फिरली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने त्याच्याकडील वनडे संघाचे कर्णधारपद काढून टाकले. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले.

एका बाजूला बीसीसीआय रोहित शर्मावर मेहरबान होत असताना विराट कोहली बाबत ते टोकाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे कदाचित दबावातून त्याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्याचा निर्णय घेतला असावा असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे रोहित-विराट जोडी पुन्हा एकत्र दिसल्यावर दोघांच्यातील मतभेद टीम इंडियाला गोत्यात आणणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण वेस्ट इंडीज दौऱ्यावर तरी दोघांत पुन्हा एकदा 'ऑल इज वेल' चित्र पाहायला मिळाले. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कपपासूनच दोघांमध्ये मतभेद असल्याचे वातावरण आहे. कदाचित मैदानाबाहेर त्यांच्यात सौख्य नसेलही पण मैदानात आम्ही एक आहोत, ही झलक ते जपणार याचे संकेतच जोडगोळीनं दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT