team india test 
क्रीडा

Team India Jersey : देख रहा हैं ना बिनोद... टीम इंडियाची टेस्ट जर्सी बदलली अन् चाहत्यांचे डोळे फिरले

लाल भडक ड्रीम 11 वर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Kiran Mahanavar

Team India Jersey : टीम इंडिया आपले पुढील मिशन यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. रोहित अँड कंपनी वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, जी बुधवारपासून डॉमिनिका येथे सुरू होणार आहे.

मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडिया आपल्या जर्सीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले आणि चाहते टीम इंडियाच्या जर्सीवर नाराज झाले.

टीम इंडियाच्या नवीन टेस्ट जर्सीवर खांद्यावर निळे पट्टे आहेत. त्याचवेळी जर्सीच्या समोर लाल रंगात ड्रीम 11 लिहिले आहे. टीम इंडियाचा ड्रीम 11 नवीन प्रायोजक आहे. ड्रीम 11चा बीसीसीआयसोबत 350 कोटींचा करार आहे. टीम इंडियाच्या नव्या टेस्ट जर्सीमुळे चाहते खूप नाराज झाले आहेत.

टीम इंडियाच्या टेस्ट जर्सीवर लाल रंग का?

टीम इंडियाच्या टेस्ट जर्सीमधला लाल रंग चाहत्यांना खूपच तिखट वाटला. त्यामुळे कसोटी जर्सी जरा जास्तच रंगीबेरंगी दिसत असल्याचे ते म्हणले. जणू ती कसोटी नसून एकदिवसीय जर्सी आहे.

टीम इंडियाच्या जर्सीतून भारताचे नाव गायब

टीम इंडियाच्या नवीन टेस्ट जर्सीमध्ये भारताचे नाव नाही. तसे हे केवळ डील अंतर्गत केले गेले आहे. खरं तर द्विपक्षीय मालिकेदरम्यान, टीम इंडियाच्या टेस्ट जर्सीच्या पुढच्या बाजूला जर्सीच्या प्रायोजकाचे नाव छापले जाते, तर आयसीसी टूर्नामेंटमध्ये देशाचे नाव लिहिले जाते. तर काही चाहते म्हणाले की, 'देख रहा हैं ना बिनोद...'

जर्सीपेक्षा टीम इंडियाचा विजय महत्त्वाचा

टीम इंडियाची नवीन टेस्ट जर्सी कशी आहे हे महत्त्वाचे नाही, पण त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेस्ट इंडिजमधील कामगिरीचा. भारतीय संघ नुकताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभूत झाला आहे. आता टीम इंडिया नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली सीरिज खेळणार आहे.

वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर भारताला चकित करण्याची ताकद आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी विजय खूप महत्त्वाचा आहे, कारण पराभव किंवा ड्रॉ तुम्हाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खूप टेन्शन देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT