ind w vs aus w t20 world cup 2023 semi final playing xi dream
ind w vs aus w t20 world cup 2023 semi final playing xi dream 
क्रीडा

IND vs AUS T20 WC: उपांत्य फेरीत भारतासमोर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान! हे आहे प्लेइंग-11

Kiran Mahanavar

हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला क्रिकेट संघासमोर आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. महिला टी-20 विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीचा थरार केपटाउनमध्ये रंगणार असून याप्रसंगी ऑस्ट्रेलियन संघ सलग सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल तर भारतीय संघ या वेळी सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी रणांगणात उतरेल.

भारतीय संघासाठी यंदाची टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा चढ-उताराची ठरली आहे. आतापर्यंत भारतीय संघाला फक्त एकाच लढतीत हार पत्करावी लागली आहे. पण पाकिस्तान व आयर्लंड यांच्याविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाला सहज विजय मिळवता आलेला नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत त्यांनी समाधानकारक कामगिरी केली. एकूणच काय तर आजच्या लढतीत भारतीय संघाला आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

स्मृती मानधना व रिचा घोष यांच्याकडून छान कामगिरी झाली आहे. पण शेफाली वर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडून फलंदाजीत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. दीप्ती शर्मा व रेणूका सिंग यांनी गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. राजेश्‍वरी गायकवाड, राधा यादव व पूजा वस्त्रकार यांनाही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

जेतेपदापासून दूरच

भारतीय महिला संघाने अद्याप एकदाही आयसीसी अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. तो मग एकदिवसीय विश्‍वकरंडक असो किंवा टी-20 विश्‍वकरंडक. भारतीय महिला संघाने 2009 व 2010 मध्ये झालेल्या टी-20 विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली. पण त्यांना पुढील मजल मारता आली नाही. त्यानंतर 2018 मध्ये झालेल्या टी-20 विश्‍वकरंडकातही भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. 2020 मधील टी-20 विश्‍वकरंडकात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. एभारतीय महिला संघ या स्पर्धेच्या जेतेपदापासून आतापर्यंत दूरच राहिला आहे.

ऐतिहासिक यश

ऑस्ट्रेलियाच्या पुरुषांच्या संघाप्रमाणे महिला संघानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 विश्‍वकरंडक चक्क पाच वेळा जिंकला आहे. सलग सहा वेळा त्यांनी अंतिम फेरीही गाठली आहे. एक वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आजच्या लढतीतही त्यांचेच पारडे जड असेल यात शंका नाही.

उपांत्य लढत

भारत - ऑस्ट्रेलिया, केपटाउन

संध्याकाळी ६.३० वाजता

भारताला यावर मेहनत घ्यावी लागणार

  • फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव

  • षटकार मारण्यात असमर्थता

  • निर्धाव चेंडू खेळण्याची वाढती टक्केवारी

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामधील उपांत्य लढत रोमहर्षक होईल. भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये चांगली झुंज दिली आहे. भारतीय संघामध्ये एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांच्याकडे मॅचविनर क्रिकेटपटूंची कमी नाही.

- बेथ मुनी, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT