75th Independence Day 2021  E Sakal
क्रीडा

Independence Day Special : भारतीय क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण क्षण

खेळ हे जगात देशाची विशेष छाप सोडण्याचं एक प्रभावी माध्यम बनले आहे.

सुशांत जाधव

75th Independence Day 2021 : जगातील मानाच्या स्पर्धेत म्हणजेच ऑलिम्पिकमध्ये देशाची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडू यंदाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुण्यांचा मान देण्यात आलाय. जपानमधील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवलीये. 15 ऑगस्ट 1947 पासून भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष छाप सोडलीये. क्रीडा क्षेत्र ही त्याला अपवाद नाही. खेळ हे जगात देशाची विशेष छाप सोडण्याचं एक प्रभावी माध्यम बनले असून भारतीय खेळाडूंनी आपल्या लक्षवेधी कामगिरीनं जगात डंका वाजवून दाखवलाय. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊयात स्वातंत्र्यानंतरचे भारतीय क्रीडा क्षेत्रातील काही खास आणि सुवर्णमयी क्षण....

1) 1948: ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीत गोल्ड

स्वातंत्र्यापूर्वीपासूनच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा विशेष बोलबाला राहिलाय. आतापर्यंत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत 8 गोल्ड, 1 सिल्वर आणि टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धेसह 3 ब्राँझ मेडल मिळवली आहेत. 1948 मध्ये भारतीय हॉकी संघाने चौथे आणि स्वांतंत्र्य भारतासाठी पहिले गोल्ड मिळवले होते. विशेष म्हणजे ग्रेट ब्रिटनला 4-0 अशी मात देत विम्बेच्या स्टेडियमवर तिरंगा फडकवला होता.

2) 1951: आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन

1951 मध्ये क्रीडा क्षेत्रातील मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राजधानी नवी दिल्लीतून 1951 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. भारताने यजमानपद भुषवलेल्या या स्पर्धेत आशियातील 11 राष्ट्रांनी वेगवेगळ्या 57 क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारत पदतालिके दुसऱ्या स्थानावर राहिला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून भारताने एकता आणि मैत्रीचा संदेश दिला होता.

3) 1952: ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं स्वातंत्र्योत्तर भारताला मिळवून दिल पहिलं वैयक्तिक मेडल

जगभरात भारतीय हॉकीचा डंका वाजत असताना जगातील मानाच्या स्पर्धेत स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले वैयक्तिक मेडल मिळाले ते कुस्ती क्रीडा प्रकारात. खाशाबा दादासाहेब जाधव यांनी 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या ऑलिम्पिक स्पर्धेत मेडलने त्यांना हुलकावणी दिली. पण 1953 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी देशाला ब्राँझ पदकाची कमाई करुन दिली.

4) 1952: मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पाचवे गोल्डही जिंकले

हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने आपला दबदबा कायम राखत पाचव्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली होती. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये ग्रेट ब्रिटनला पराभूत करत फायनल गाठली आणि त्यानंतर नेदरलँडला फायनलमध्ये 6-1 असे पराभूत केले.

5) 1952: टेबल टेनिसमध्ये गुल नासिकवाला यांची लक्षवेधी कामगिरी

ज्या काळात टेबल टेनिसमध्ये चीन, जपान आणि दक्षिण कोरियासह अन्य राष्ट्रांचा दबदबा होता त्या काळात महिला गटात गुल नासिकवाला यांनी आपली विशेष छाप सोडली. सिंगापूर येथील आशियाई क्रीडा प्रकारात गुल नासिकवाला या महिला टेबल टेनिसपटूने एकेरी आणि दुहेरीत भारताला पदकाची कमाई करुन दिली.

6) 1952: भारतीय क्रिकेट संघाने जिंकली पहिली कसोटी

1933 पासून भारतीय संघ क्रिकेटच्या मैदानात उतरला असला तरी पहिली कसोटी जिंकण्यासाठी दोन दशकांची प्रतिक्षा करावी लागली. मायदेशात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिली कसोटी मालिका जिंकली. दिल्ली आणि मुंबईतील कसोटी सामन्यासह भारताने पाकिस्तान विरुद्धची मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली होती.

7) 1956: ऑलिम्पिकमध्ये गोल्डचा षटकार

जगातील मानाच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला 1-0 असे पराभूत करत सहाव्यांदा गोल्ड मेडल पटकावले होते. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात रणधीर सिंग यांच्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली होती.

8) 1956: ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल टीम पदकाच्या अगदी जवळ पोहचलेली

फुटबॉल जगतातील बलाढ्य हंगेरी संघाच्या वॉक ओवरनंतर नेविल डिसूजा यांच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र युगोस्लाविया विरुद्दच्या लढतीतील 4-1 अशा पराभवानंतर भारतीय फुटबॉल संघ पदकापासून वंचित राहिला. पण ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेली ही सर्वोच्च कमागिरी ठरली.

9) 1958 विल्सन जोन्सने इंग्लिश खाडी पार करुन रचला होता इतिहास

विल्सन जोन्स यांनी भारताचे पहिले वहिले बिलियर्डस्‌पटू ठरले. 1958 मध्ये त्यांनी जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. 1964 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने 1966 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

10) 1958: राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत पहिले मेडल

कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत 1958 मध्ये भारताने कुस्ती क्रीडा प्रकारात पहिल्यांदा सुवर्ण कामगिरी नोंदवली. कुस्तीपटू लीला राम सांगवान यांनी हेवीवेट वजनी गटात गोल्डन कामगिरी करुन दाखवली होती.

11) 1958: इंग्लिश खाडी पार करुन भारतीय जलतरण पटूने रचला इतिहास

27 सप्टेंबर 1958 मध्ये मिहिर सेन यांनी 14 तास 45 मिनिटांत इंग्लिश खाडी पार करण्याचा पराक्रम करुन दाखवला. इंग्लंडचा दक्षिण किनारा आणि फ्रान्सचा उत्तर किनारा या दोन्हीमधील अटलांटिकाचा भाग हा इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. डोव्हरच्या सामुद्रधुनीने उत्तर समुद्राला जोडली गेलेली खाडी पार करणारे ते पहिले भारतीयच नव्हे तर आशियातील पहिले स्वीमर आहेत.

12) 1960: भारतीय टेनिसपटूची विम्बल्डन स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी

1960 मध्ये रामानाखन कृष्णन यांनी विम्बल्डनची सेमीफायनल गाठत मैलाचा पल्ला गाठला होता. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील त्यांचा प्रवास ऑस्ट्रिलियन नील फ्रेझर यांनी संपुष्टात आणला. पण टेनिसमध्ये भारतीय खेळाडूची ताकद त्यांनी या स्पर्धेत दाखवून दिली.

13) 1960: अ‍ॅथलेटिक्समध्ये फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांनी दाखवली भारताची ताकद

1958 टोकियो आशियाई क्रीडा प्रकारत मिल्खा सिंग यांनी 200 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्डन कामगिरी नोंदवण ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची आस पल्लवित केली. 1960 मध्ये रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मिल्खासिंग फायनलमध्ये पोहचले होते. चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांचे पदकाचे स्वप्न अधूरे राहिले. पण त्यांच्या या कामगिरीने अ‍ॅथलिटिक्समध्ये एक ऊर्जा भरण्याचे काम केले. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांचे स्वप्न नीरज कुमारने साकार केले.

14) 1961-62: भारताने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकून रचला इतिहास

सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात भारताचा दबदबा पाहयला मिळतो. 1961-62 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने घरच्या मैदानात पाहुण्या इंग्लंडचा धुव्वा उडवत पाच सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली होती. पहिल्या तीन कसोटी सामने अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने कोलकाता आणि मद्रासच्या मैदानात पाहुण्यांना पराभूत करत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला होता.

15) 1962: भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळवले होते दुसरे गोल्ड

स्पर्धेली प्रबव दावेदार असलेल्या दक्षिण कोरियाला धक्कादायकरित्या पराभूत करत भारतीय संघाने आशियाई क्रीडा प्रकारात गोल्डन कामगिरी करुन दाखवली होती. पीके बॅनर्जी आणि जरनेल सिंग धिल्लोन यांनी सुरुवातीला डागलेल्या गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल टीमने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती.

16) 1962 आशियाई गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये पहिले गोल्ड

जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इंडियन बॉक्सर पदम बहादुर माल यांनी देशासाठी पहिले वहिले गोल्ड मिळवून दिले होते. 60 किलो वजनी गटात त्यांनी जपानच्या बॉक्सरला पराभूत करण्याचा पराक्रम नोंदवला होता.

17) 1964: इंडियन हॉकी टीम Golden अफेयर इन ऑलिम्पिक

1960 प्रमाणेच चार वर्षांनी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनलचा योगायोग जुळून आला. यावेळीही भारतीय संघाने 1-0 असा विजय नोंदवत हॉकीमधील आपला गोल्डन धमाका कायम राखला होता.

18) 1965: माउंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई

गिर्यारोहण क्रीडा प्रकार फार लोकप्रिय नसला तरी 1965 मध्ये अवतारसिंग चीमा यांच्या नेतृत्वाखालील इंडियन आर्मीच्या 9 जणांच्या टीमने माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर गाठण्याची मोहिम फत्ते केली होती. जवळपास 17 वर्षे हा विक्रम आबाधित राहिला होता.

19) 1967: भारतीय क्रिकेट संघाने विदेशात जिंकली कसोटी

मन्सूर अली पैतोडी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. भारतीय संघाने न्यूझीलंडला 3-1 अशी मात दिली होती.

20) 1980: भारतीय हॉकी संघाचे ऑलिम्पिकमध्ये शेवटचे गोल्ड

मास्को येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आठव्यांदा गोल्ड मेडल जिंकले होते. भारतीय संघाने फायनलमध्ये स्पेनचा 4-3 असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर 41 वर्षांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ब्राँझ पदक कमावण्यात यश आले. पॅरिसमध्ये गोल्डचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय हॉकी संघ मैदानात उतरेल.

21) 1980: प्रकाश पादुकोन यांची विक्रमी कामगिरी

भारताचे बॅडमिंटन स्टार प्रकाश पादुकोन यांनी बॅडमिंटनमध्ये एक मोठे उदाहरण सेट केले. ऑल इंग्लंड चॅम्पियशिपमधील त्यांची ऐतिहासिक कामगिरीने भारतीय क्रीडा क्षेत्रारडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारी अशीच होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT