Ruturaj Gaikwad celebrates his century as India A defeats South Africa A by four wickets in the One-Day series.
esakal
India A win over South Africa A as Ruturaj Gaikwad smashed century : भारत अ संघाने पहिल्या अनऑफिशियल एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाचा ४ विकेट्स राखून पराभव केला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ऋतुराज गायकवाड ठरला, त्याने धडाकेबाज शतक ठोकत ११७ धावा करून, भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
या विजयाबरोबरच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आता १६ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हर्षित राणाने शेवटच्या षटकात षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. भारताने ४९.३ षटकांत २८६ धावांचे लक्ष्य ओलांडले आणि ६ बाद २९० अशी मजल मारली.
एका बाजूने भारत्या एकामागोमाग विकेट पडत असताना ऋतूराज गायकवाडे चिवट खेळी करून १२९ चेंडूत ११७ धावा केल्या. या डावात त्याने १२ चौकारही मारले. त्याने ही धडाकेबाज शतकी खेळी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले.
लिस्ट ए क्रिकेटमधील हे त्याचे १७ वे शतक आहे. याचबरोबर त्याने भारताच्या नॅशनल टीममध्ये स्थान मिळवण्याचा दावाही पक्का केला आहे. श्रेयस अय्यर जखमी असल्याने सोशल मीडियावर त्याला टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत ८७ लिस्ट ए सामन्यांपैकी ८४ डावांमध्ये ४४४१ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ७३ डावांमध्ये ३१४६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ९ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.