arshdeep singh jersey sakal
क्रीडा

IND vs WI : जर्सी एक-प्लेयर तीन! बीसीसीआयच्या लगेजचे वाजलेत तीन तेरा

भारताचे तीन खेळाडू अर्शदीप सिंगची जर्सी घालून खेळत होते, त्याचा हा फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

India and West Indies 2nd T20I : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा पाच विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 138 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने 5 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. या सामन्यात भारताचे तीन खेळाडू अर्शदीप सिंगची जर्सी (arshdeep singh jersey) घालून मैदानात उतरले होते. त्याचा हा फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

भारताचे तीन खेळाडू अर्शदीप सिंगची जर्सी घालून खेळत होते. प्रथम सूर्यकुमार यादवने अर्शदीपची जर्सी घालून भारताच्या डावाला सुरुवात केली. यानंतर आवेश खानही अर्शदीपच्या जर्सीत दिसला. संघाचे लगेज (Team Luggage) वेळेवर पोहचणार नसल्याने सामान उशिरा म्हणजे आठ ऐवजी अकरा वाजता सुरू झाला. अशा परिस्थितीत खेळाडूंना एकमेकांची जर्सी घालावी लागली.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19.4 षटकांत सर्वबाद 138 धावांवर आटोपला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 आणि रवींद्र जडेजाने 27 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने 4 षटकात 17 धावा देत 6 बळी घेतले. प्रत्युत्तरात विंडीज संघाने 5 विकेट्सवर 145 धावा करत सामना जिंकला. सलामीवीर ब्रेंडन किंगने सर्वाधिक 68 धावांची खेळी खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT