Indian and Bangladesh cricket relations face uncertainty as violence-related incidents raise serious safety concerns for international matches.
esakal
India Bangladesh cricket relations face uncertainty : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भविष्यात क्रीडा विश्वात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेशी खेळाडूंना आता पाकिस्तानी खेळाडूंसारखेच भवितव्य भोगावे लागेल का? अशा चर्चाही इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी सुरू झाल्या आहेत.
२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर, पाकिस्तानी खेळाडूंना प्रशिक्षक आणि कॉमेटरीच्या संधी देखील रोखण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाप्रमाणेच आता जरी कारणे वेगळी असली तरी बांगलादेशबाबतही काहीशी हिच स्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
२०२४ मध्ये शेख हसीना सरकार पाडण्यात आल्यानंतर शेख हसीना भारतात निघून आल्या यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली. नंतर आता २०२५ च्या अखेरीस बांगलादेशमध्ये उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार उसळला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली.
त्यानंतर, बांगलादेशातील दीपू दास या हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करून त्याला जाळलं गेलं, तेव्हा भारतात संतापाची लाट उसळली. बांगलादेशविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सोशल मीडियावर सुरू झाली आणि याचा थेट परिणाम आता क्रीडा क्षेत्रावर जाणवत आहे. केवळ एवढी एकच घटना नाही तर बांगलादेशात दररोजच हिंदूवर जीवघेणे हल्ले सुरू आहेत.
आयपीएल २०२६ च्या लिलावात खरेदी केलेला मुस्तफिजूर रहमान हा एकमेव बांगलादेशी खेळाडू होता. त्याला वगळण्याचा बीसीसीआयचा निर्णय घेत, तसे निर्देशही केकेआर संघाला दिले गेले. क्रीडा वृत्तीपेक्षा सार्वजनिक भावनेला प्राधान्य दिलं गेल्यांचे यातून दिसते. तर बांगलादेशी खेळाडूंवर अद्याप कोणतीही अधिकृत काळ्या यादीत बंदी घालण्यात आलेली नसली तरी, मुस्तफिजूरच्या प्रकरणावरून हे स्पष्ट होते की भविष्यात कोणत्याही फ्रँचायझीसाठी बांगलादेशी खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट करणे परवडणारे नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.