U19 Cricket World Cup  esakal
क्रीडा

U19 Cricket World Cup : अखेर 19 वर्षांच्या मुलींनी न्यूझीलंडचा अवघड पेपर सोडवला, गाठली वर्ल्डकपची फायनल

अनिरुद्ध संकपाळ

U19 Cricket World Cup : गेल्या काही आयसीसी स्पर्धेत बाद फेरीत भारतासाठी न्यूझीलंड एक डोकेदुखी ठरत होती. हॉकी वर्ल्डकपमध्येही न्यूझीलंडने भारताला मात दिली होती. अखेर न्यूझीलंडचा बाद फेरीतील अवघड पेपर सोडवण्याचे काम भारताच्या 19 वर्षांच्या महिला क्रिकेट संघाने केलं.

19 वर्षाखालील महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 107 धावात रोखले होते. हे आव्हान भारताने 14.2 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आता भारताचा अंतिम सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघासोबत होणार आहे.

19 वर्षाखालील महिला क्रिकेट टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने न्यूझीलंडला सुरूवातीपासूनच धक्के दिले.

न्यूझीलंडची अवस्था 2 बाद 5 धावा अशी झाली असताना प्लिमेर (35) आणि इसाबेल गाझे (26) यांनी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही जोडी भारताच्या पार्शवी चोप्राने तोडली अन् किवींची फलंदाजी ढेपाळण्यास सुरूवात झाली.

भारताकडून पार्शवी चोप्राने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी टिपले. तिला साधू, अर्चना देवी, शफाली वर्मा आणि मन्नत कश्यप यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेत न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 107 धावात रोखले.

न्यूझीलंडचे 107 धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या हे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 14.2 षटकात पार केले. भारताकडून सलामीवीर श्वेता शेरावतने धडाकेबाज फलंदाजी करत 45 चेंडूत नाबाद 61 धावा चोपल्या. तर सोम्या तिवारीने 22 धावांचे योगदान दिले. शफाली वर्मा 10 धावा करून बाद झाली.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT