India Legends vs South Africa Legends 
क्रीडा

India Legends ची विजयी सुरुवात; स्टुअर्ट बिन्नीने ठोकले अर्धशतक

India Legends vs South Africa Legends : इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी केला पराभव

Kiran Mahanavar

India Legends vs South Africa Legends : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात सामना खेळला गेला. इंडिया लिजेंड्सने या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी पराभव केला. इंडिया लिजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंडिया लिजेंड्सने सुरुवात चांगली झाली. सचिन तेंडुलकर आणि नमन ओझा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. यानंतर सचिन तेंडुलकर 15 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात नमनही 21 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सुरेश रैनाने 22 चेंडूत 33 धावांची दमदार खेळी केली. युवराजने 8 चेंडूत 6 धावा केल्या. युसूफ पठाणने 12 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. भारताने शेवटच्या पाच षटकात 80 पेक्षा जास्त धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने 42 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 82 धावांचे तुफानी अर्धशतक झळकावले. इंडिया लिजेंड्सने 20 षटकांत दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला 217 धावांचे मोठे लक्ष्य दिले.

दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला केवळ 156 धावा करता आल्या. इंडिया लिजेंड्सने हा सामना 61 धावांनी जिंकला. भारताकडून राहुल शर्माने चार षटकांत १७ धावा देत तीन बळी घेतले, तर मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय इरफान पठाण आणि युवराज सिंगनेही प्रत्येकी एक विकेट घेतली.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत, जे 4 शहरांमध्ये एकूण 23 सामने खेळणार आहेत. सहभागी संघांमध्ये इंडिया लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स यांचा समावेश आहे. लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT