India vs Sri lanka First ODI sakal
क्रीडा

Ind vs Sl 1st ODI: इशान किशन बाहेर! सूर्यावरही टांगती तलवार, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

विक्रमी द्विशतकानंतर ईशानसह सूर्यकुमारही राखीव? विश्वकरंडकाच्या तयारीसाठी सज्ज

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Sri lanka First ODI : येत्या काही महिन्यांनंतर मायदेशातच होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची तयारी भारतीय संघ आजपासून सुरू करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतून काही प्रयोग केले जातील, पण त्यासाठी संघनिवडीचे आव्हान असणार आहे.

रोहित शर्माचे पुनरागमन होत आहे. सोबत विराट कोहलीसुद्धा सज्ज आहे. गेल्या दोन वर्षांत हे दोघे एकत्रित पण दोनच एकदिवसीय सामने खेळले होते. रोहित-विराटसह बुमराही या मालिकेत खेळणार होता, परंतु तो अजून तंदुरुस्त झालेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत अतिप्रयोग मुळावर येत असल्याचे समजताच भारताने अंतिम सामन्यात मात्र ताकदीचा खेळ केला आणि बाजी मारली होती, पण उद्याच्या सामन्यात ईशान किशनऐवजी सलामीला शुभमन गिलला संधी देण्याचा प्रयोग मात्र केला जाणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ईशानने विश्वविक्रमी वेगवान द्विशतक केले होते; मात्र या विक्रमी खेळीनंतर त्याला राखीव खेळाडूत राहावे लागणार असल्याचे रोहितच्या व्यक्तव्यातून स्पष्ट होत आहे.

दोन दिवसांपूर्वी ट्वेन्टी-२० सामन्यात आक्रमक शतक करणाऱ्या सूर्यकुमारला संधी दिली जाते, की तोही राखीव खेळाडूत राहतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. बांगलादेशविरुद्ध मालिकेत सर्वोत्तम राहिलेला श्रेयस अय्यरही संघात असेल, तसेच उपकर्णधार असल्याने हार्दिक पंड्या संघातला महत्त्वाचा घटक असून तो अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी सांभाळेल.

बुमराने माघार घेतल्यामुळे मोहम्मद शमीवर नव्या चेंडूची जबाबदारी असेल. त्याचा साथीदार म्हणून अर्शदीप की सिराज यापैकी कोणाला संधी दिली जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच संपलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत अक्षर पटेलने फलंदाजीत चमक दाखवली होती. त्यामुळे फिरकी अष्टपैलू म्हणून त्याचे स्थान नक्की असेल. सोबत कुलदीप यादवऐवदी युझवेंद्र चहलला पसंती मिळू शकते.

संघ यातून निवडणार : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, महम्मद शमी, महम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT