India vs Pakistan Asia Cup 2022 
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तानला ICC ने केली मोठी शिक्षा, वाचा काय आहे प्रकरण?

सामना रोमांचक झाला, पण दोन्ही संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने शिक्षा ठोठावली आहे.

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात सिक्स मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामना रोमांचक झाला, पण दोन्ही संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने शिक्षा ठोठावली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना सामन्यांमध्ये स्लो-ओव्हर रेट ठेवल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीचे मॅच रेफरी जेफ क्रो यांनी रोहित शर्मा आणि बाबर आझम या संघांना वेळेचे पालन न केल्यामुळे ही शिक्षा सुनावली. दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकली आहेत.

ICC च्या कलम 2.22 नुसार स्लो ओव्हर रेटशी संबंधित त्रुटींशी संबंधित आहे. यानुसार जर एखाद्या संघाला निर्धारित वेळेत 20 षटके करता आली नाहीत, तर प्रत्येक षटकासाठी खेळाडूंच्या मॅच फीच्या 20 टक्के रक्कम कापण्याचा नियम आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन षटके कमी केली होती. त्यामुळे 40 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनी चूक मान्य केली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायच झाल तर, म इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि पाकिस्ताने 19.5 षटकात 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. भारताकडून विराट कोहलीने 35 धावा, रवींद्र जडेजाने 29 चेंडूत 35 धावा आणि हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने तीन आणि नसीम शाहने दोन गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT