Indian sprinter dutee chand announces marriage with partner monalisa shared photo on instagram  
क्रीडा

Dutee Chand Marriage : स्प्रिंटर दुती चंदने पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ? फोटो शेअर करत म्हणाली…

सकाळ डिजिटल टीम

Dutee Chand Marriage With Monalisa : भारतीय अॅथलीट दुती चंदने तिची समलैंगिक पार्टनर मोनालिसासोबत लग्न केले आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दुतीने तिचे समलैंगिक संबंध फार पूर्वीच उघड केले होते.

दुतीने आता तीच्या इंस्टग्रामवर पार्टनरसोबत लग्नाच्या कपड्यांममध्ये फोटो शेअर केला असून याल 'लव्ह इज लव्ह' असं कॅप्शन दिलं आहे. या लग्नाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दुती यांच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात असून यावर अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

दुतीने आपल्या पार्टनरसोबतचे फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने ट्विटरवर लिहिले, “कालही तुझ्यावर प्रेम केले आणि अजूनही करत आहे. प्रेम सदैव असेल." या फोटोला अनेकांनी लोकांनी ट्विटरवर लाईक केले आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुती यांच्या या निर्णयाचे सोशल मीडिया यूजर्सही कौतुक करत आहेत. इंस्टाग्रामवरही दुतीच्या फोटोला अनेक लोकांनी लाईक केले आहे.

2014 च्या कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान दुती चंदची हार्मोनल वाढ समोर आली होती. तीच्यावर पुरुष असल्याचा आरोप करण्यात आला. याच कारणामुळे ती 2014 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र, त्यानंतर त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दुतीने भारतासाठी दोन रौप्य पदके जिंकली आहेत. आशियाई चॅम्पियनशिपमध्येही तीने कांस्यपदक पटकावले होते. दुतीने 2013 आणि 2017 मध्ये पदके जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT