Chetan Sakarya File Photo
क्रीडा

SL vs Ind : "स्वप्न सत्यात उतरल्याचे पाहायला बाबा हवे होते"

मी टीम इंडियाकडून खेळावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

सुशांत जाधव

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या स्वतंत्र्य संघात नवोदित खेळाडूंचा भरणा असल्याचे पाहायला मिळले. पहिल्यांदाच एखाद्या परदेशी दौऱ्यासाठी मोठ्या संख्येने नवोदित खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यातील एक नाव म्हणजे आयपीएलमध्ये लक्षवेधी ठरलेला चेतन सकारिया. टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघातील जलदगती गोलंदाज चेतन सकारिया भावूक झालाय. राष्ट्रीय संघात निवड झाल्याचे पाहण्यासाठी वडील असायला हवे होते, अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिलीये. (India Tour Of Sri Lanka Chetan Sakariya Miss His Father After Getting Place In Team India Squad)

प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये चेतन सकारिया म्हणाला की, हे सर्व पाहण्यासाठी माझे बाबा असायला हवे होते, असे वाटते. मी टीम इंडियाकडून खेळावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण टीम इंडियात स्थान मिळाल्याचे पाहायला ते आपल्यात नाहीत. या क्षणी त्यांची आठवण येत आहे. वर्षभरात चढ उताराचा सामना करावा लागला, असेही तो यावेळी म्हणाला.

तो म्हणाला की, भावाला गमावल्याच्या दु:खात असताना आयपीएलचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. मागील महिन्यात मी वडिलांनाही गमावले. आता मला टीम इंडियात स्थान मिळाले. वडील मृत्यूशी झुंज देत असताना 7 दिवस रुग्णालयात होतो. या परिस्थितीतही आई आणि वडिलांनी क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली. वडिलांची उणीव सतत भेडसावत राहिल, अशी भावूक प्रतिक्रिया सकारियाने दिली.

चेतन सकारियाच्या वडिलांचे 9 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. ते टेम्पो ड्रायव्हिंगचे काम करायचे. मेहनत करुन त्यांनी आपल्या लेकाला क्रिकेटर बनवले. लेकाने राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. पण आज तो क्षण पाहण्यासाठी ते आपल्यात नाहीत. सकारियाने आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व केले होते. 7 सामन्यात 8.22 च्या इकोनॉमी रेटने त्याने 7 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या विकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या विकेटचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Asia Cup U19: भारताने दिलेली जखम पाकिस्तानच्या जिव्हारी! उपांत्य फेरीत न खेळताच जाणार घरी; बांगलादेश फायनलला पोहोचणार

Uttar Pradesh: व्हिडिओकॉनचा UP मध्ये बनवणार टीव्ही आणि फ्रीज! ११०० कोटींची गुंतवणूक; ६००० जणांना मिळणार रोजगार

SCROLL FOR NEXT