IND vs AUS esakal
क्रीडा

IND vs AUS : गांगुलीच्या पराभवाचा रोहित घेणार बदला! 20 वर्षानंतर पराभवाचं उट्ट काठण्याची संधी

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 India Vs Australia Final : ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप 2023 मधील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात दक्षिण अफ्रिकेचं कडवं आव्हान मोडून काढत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकात अफ्रिकेचे 213 धावांचे आव्हान 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.

आता भारत आणि ऑस्ट्रेलिया 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये भारत - ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होणार आहे. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 125 धावांनी पराभव केला होता. त्यावेळी संघाचा कर्णधार सौरव गांगुली होती. आता रोहित शर्माकडे या पराभवाचं उट्ट काढण्याची नामी संधी आहे.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याऱ्या भारतीय संघाने 2003 ला अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताची चांगलची धुलाई केली होती. त्यांनी 50 षटकात 2 बाद 359 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताला फक्त 234 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

भारताकडून हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेतल्या होत्या. गिलख्रिस्ट आणि हेडन या सलामी जोडीने 105 धावांची शतकी सलामी दिली होती. गिलख्रिस्टने 48 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. तर हेडन 37 धावा करून बाद झाला होता.

मात्र त्यानंतर आलेल्या रिकी पाँटिंगने 140 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याला मार्टिनने 88 धावा करत समर्थ साथ दिली होती.

ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांच्या भीमकाय टार्गेट चेस करताना भारताकडून विरेंद्र सेहवागने 82 तर राहुल द्रविडने 47 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकर त्या सामन्यात 4 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅग्राथने 3 तर ब्रेट ली आणि अँड्र्यू सायमंड्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. कांगारूंनी भारताचा डाव 39 षटकातच गुंडाळला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT