India vs Bangladesh Test Series  sakal
क्रीडा

Ind vs Ban Test Series: 'भरत'च भविष्य बर्बाद करण्यासाठी 'पंत' अकेला ही काफी है!

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फ्लॉप ऋषभ पंत या खेळाडूसाठी ठरला व्हिलन!

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Test Series : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग होता पण दुखापतीमुळे संघातून बाहेर जावे लागले. आता तो कसोटी मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून खेळल्या जाणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत आपल्याच संघातील एका खेळाडूसाठी व्हिलन ठरू शकतो.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंत टीम इंडियाची पहिली पसंती असणार आहे. या कसोटी मालिकेच्या संघात युवा यष्टीरक्षक केएस भरतचाही समावेश आहे, मात्र पंतच्या संघात असताना त्याला भारताकडून एकही सामना खेळण्याची संधी अद्याप मिळालेली नाही. या सामन्यातही केएस भरत बेंचवर बसलेला दिसेल.

केएस भरतला ऋषभ पंतचा बॅकअप यष्टिरक्षक म्हणून कसोटी संघात ठेवण्यात आले आहे. तो फक्त टीम इंडियाच्या संघाचा एक भाग आहे. काही काळापासून त्याचा कसोटी संघात समावेश केला जात आहे. केएस भरतने टीम इंडियासाठी एका सामन्यात विकेटकीपिंगही केले आहे. दुखापतग्रस्त रिद्धिमान साहाचा पर्याय म्हणून केएस भरतने कसोटी सामन्यात विकेटकीपिंग केले होती.

केएस भरत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश संघाकडून खेळतो. केएस भरतने 2013 मध्ये डेब्यू सामना खेळला होता. त्याने 83 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4502 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 शतके आणि 25 अर्धशतके झळकावली आहेत. तर फर्स्ट क्लास मध्ये त्याने 64 सामन्यात 1950 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 6 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत.

  • बांगलादेश कसोटीसाठी टीम इंडिया

    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, उन्‍नत जाधव. , मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT