Shardul Thakur And Hardik Pandya
Shardul Thakur And Hardik Pandya  
क्रीडा

अर्धशतक शार्दूलचं अन् चर्चा हार्दिकची; नक्की झालं तरी काय?

सुशांत जाधव

India vs England 4th Test : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात शार्दूल ठाकूरने लागोपाठ दोन डावात दोन अर्धशतक झळकावत सर्वांच लक्षवेधून घेतले आहे. पहिल्या डावात 57 धावांची तडाखेबाज खेळी करणाऱ्या शार्दूलने दुसऱ्या डावात 60 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातील खेळीत त्याने 7 खणखणीत चौकारासह एक गगनचुंबी षटकारही खेचला. रिषभ पंतच्या साथीनं शतकी भागीदारी करुन त्याने भारताला मजबूत आघाडी देण्यात मोलाचा वाटा उचलला.

बॅटिंगमध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीनंतर सोशल मीडियावर शार्दूल ठाकूर ट्रेंडिगमध्ये आलाय. ते सहाजिकच आहे. पण त्याच्यासोबत आता हार्दिक पांड्याही ट्रेंडमध्ये दिसतोय. आता अर्धशतकांचा डबल बार शार्दूलने उडवल्यावर पांड्या का ट्रेंड करतोय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. जाणून घेऊयात त्यामागचे नेमकं कारण..

इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या ताफ्यात शार्दूल ठाकूरला अष्टपैलू म्हणून संधी देण्यात आली आहे. तो जलदगती गोलंदाजी करतो. चौथ्या गोलंदाजाची भूमिका बजावत बॅटिंगमध्ये क्षमता असणाऱ्या अष्टपैलूला भारतीय संघात प्राधान्याने पसंती दिली जाते. या भूमिकेसाठी हार्दिक पांड्या फिटही झाला होता. दुखापतीनंतर हार्दिक पांड्या फार काळ गोलंदाजी करताना दिसला नाही. तो सातत्यपूर्ण गोलंदाजी करत नसल्यामुळेच इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियातून त्याचा पत्ता कट झाला.

शार्दूल ठाकूरने आपल्या बॅटिंगच कसब दाखवून दिल्यामुळे हार्दिक पांड्याचे स्थान धोक्यात असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. इंग्लंडमध्ये भलेभले फलंदाज संघर्ष करत असताना शार्दूल ठाकुरने केलेली खेळी भविष्यात त्याच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT