rishabh pant and ravindra jadeja
rishabh pant and ravindra jadeja  
क्रीडा

Video: पंतने दिले जडेजाला शतकाचे श्रेय, तो होता म्हणून...

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने इंग्लंडवर वर्चस्व राखले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे संघाची कमान दिली. सामन्यात भारताची सुरुवात काही खास झाली नाही आणि संघाचे पाच प्रमुख फलंदाज अवघ्या 98 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले. यानंतर भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सांभाळला. (rishabh pant and ravindra jadeja watch video bcci)

बीसीसीआयने सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंत म्हणाला की, मी कोणत्याही सामन्यात आपले शंभर टक्के योगदान देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. सामन्यांमध्ये भागीदारीसाठी तुम्हाला विश्वास ठेवता येईल अशा व्यक्तीची गरज असते. मला वाटतं जडेजा समोर असण्याने खूप फरक पडला. तो दुसऱ्या टोकावरून शांतपणे फलंदाजी करत खंबीरपणे उभा राहिला. तो होता म्हणून मी शतक करू शकलो, आणि माझा नैसर्गिक खेळ खेळू शकलो. रवींद्र जडेजा याबद्दल बोलताना म्हणाला की, भारतात आम्ही चांगली कामगिरी करतो. फलंदाजी असो की गोलंदाजी, पण विरोधी संघाच्या आवडत्या मैदानात आपण चांगली कामगिरी करतो तर यापेक्षा आनंददायी काहीही असू शकत नाही.

भारताच्या पहिल्या डावात सलामीची विकेट गमावल्यानंतर या दोन खेळाडूंनी महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली. एवढेच नाही तर या सामन्यात हे दोन्ही फलंदाज शतके झळकावण्यातही यशस्वी ठरले. पंतने पहिल्या डावात 111 चेंडूत 146 धावा केल्या होत्या. त्याचवेळी जडेजाने 194 चेंडूत 104 धावांची सुरेख शतक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT