Team India Probable Playing 11 vs England Marathi News sakal
क्रीडा

Ind vs Eng : पहिल्या कसोटीत कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी, जाणून घ्या कशी असेल भारताची playing-11?

India vs England Test Series : हैदराबाद कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंचा करणार समावेश?

Kiran Mahanavar

Team India Probable Playing 11 vs England :

Team India Probable Playing 11 vs England : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने भारतीय संघातून आपले नाव मागे घेतले. कोहलीच्या जागी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र, पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की तो बेंचवर बसणारा हे पाहणे बाकी आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो हे जाणून घेऊया.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी संघाचा पहिला सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावर भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा अनोखा विक्रम आहे.

अश्विनने या मैदानावर सर्वाधिक कसोटी विकेट घेतल्या आहेत. त्याने येथे खेळलेल्या एकूण 4 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रवींद्र जडेजानेही येथे खेळल्या गेलेल्या एकूण 3 सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. अशा स्थितीत या दोघांचाही पहिल्या कसोटीत समावेश होऊ शकतो.

पाटीदारांना संधी मिळणार का?

या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा भाग नसल्यामुळे त्याच्या जागी पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत पाटीदारलाही संघात स्थान मिळणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, केएल राहुल भारतीय संघासाठी विकेटकीपरींग करणार नाही. काल भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळेल, अशा परिस्थितीत भारतीय संघाला यष्टीरक्षक फलंदाजाचीही गरज भासणार आहे. केएस भरतचा संघात समावेश करून त्याला संघात ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत 3 फिरकीपटूंसह खेळेल, अशी अपेक्षा आहे, अशा स्थितीत अक्षर पटेलही खेळणार हे निश्चित मानले जात आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमारचा समावेश होऊ शकतो. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासोबत ओपनिंग केली आहे, त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा संघात समावेश केला जाऊ शकतो.

भारतीय संघाचे कसे असतील प्लेइंग इलेव्हन?

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT