Axar Patel  Sakal
क्रीडा

IND vs NZ : 'ढाई अक्षर प्रेम के' कानपूरच्या मैदानात पटेल पेटला!

पहिल्या चार कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे.

सुशांत जाधव

कानपूरच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अक्षर पटेलनं (Axar Patel) गाजवला. न्यूझीलंडचा अर्धा संघ त्याने तंबूत धाडला. या कामगिरीसह पहिल्या चार कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. नरेंद्र हिरवानी (Narendra Hirwani) यांनी पहिल्या चार सामन्यात 36 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल त्यांना ओव्हरटेकही करु शकतो.

पहिल्या चार कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 26 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ एस व्यंकटरागवन, एल शिवरामाकृष्णन आणि जसप्रित बुमराह प्रत्येकी 21 विकेटसह संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहे. रविंद्र जाडेजाने पहिल्या चार कसोटी सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या.

भारतीय संघाचा पहिला डाव 345 धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावाला दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवसाअखेर ही जोडी शतकी भागीदारी करुन नाबाद राहिली होती. आर अश्विनने तिसऱ्या दिवसाच्या खेळात ही जोडी फोडली. विल यंग (Will Young) आणि टॉम लॅथम (Tom Latham) यांनी पहिल्या विकेटसाठी 151 धावांची खेळी केली. ही जोडी माघारी फिरल्यानंतर न्यूझीलंडची फलंदाजी कोलमडली. उमेश यादवने केन विल्यमसनला अवघ्या 18 धावांवर बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने विकेटचा सपाटा लावला. त्याने अर्धा संघ तंबूत धाडला.

सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करुनही न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर आला आहे. न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज 300 पार करुन आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाला अल्प आघाडी मिळवून मॅचवर पकड मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यात अक्षर पटेलचा मोठा वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं, गुन्हा दाखल

पाय फ्रॅक्चर झाल्यावरही नृत्याच्या कार्यक्रमासाठी जिद्दीने उभी राहिली अभिनेत्री; "फक्त मनात ठरवता.."

SCROLL FOR NEXT