India vs Pakistan Asia Cup 2022
India vs Pakistan Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Video : विराट कोहलीने पाकविरुद्धच्या पराभवाला यांना धरले जबाबदार

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2022 : टीम इंडियाला आशिया कपमधील सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तान संघाने भारताचा पाच गडी राखून पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. दुबईत ४ सप्टेंबरला संध्याकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले.

सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत पराभवाचे मोठे कारण सांगितले आहे.

भारताकडून पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली सर्वाधिक 44 चेंडूत 60 धावा केल्या. अखेरच्या षटकात विराट कोहलीची विकेट पडली. त्याच्या 60 धावांच्या जोरावर भारतीय संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावांपर्यंत मजल मारू शकला.

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, नाणेफेक हरलेल्या टीम इंडियाची योजना स्कोअर बोर्डवर एकूण 200 प्लस जोडण्याची होती. यासाठी चांगली सुरुवात झाली, पण मधल्या फळीत निराशाजणक कामगिरीमुळे ते झाल नाही. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या केवळ 40 धावा जोडून डगआउटमध्ये परतले. आमचा स्कोअर 200 प्लस असता तर आम्ही जिंकू शकलो असतो. पण आम्ही त्या लक्ष्याच्या 20-25 धावांनी मागे पडलो.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेटवर 181 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर पाकिस्तानने 5 गडी गमावून 182 धावा करत सामना जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT