ODI World Cup  sakal
क्रीडा

ODI World Cup 2023 Schedule : वर्ल्डकप 2023 शेड्यूल बदललं, 'या' 6 मोठ्या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल?

Kiran Mahanavar

Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट विश्वचषक 2023 च्या हाई-वोल्टेज सामन्याव्यतिरिक्त इतर मोठ्या सामन्यांच्या तारखा देखील बदलतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित वर्ल्ड कप सामना 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. पीसीबीने त्यांच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्याच्या ICC आणि BCCI च्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. नवरात्रोत्सवामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या हाई-वोल्टेज सामन्यासह एकूण 6 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होणार आहे. RevSportz च्या अहवालानुसार, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्ड कप सामना 12 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबरला होऊ शकतो. न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यातील विश्वचषक सामना 9 ऑक्टोबर ऐवजी 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील विश्वचषक सामना 14 ऑक्टोबर ऐवजी 15 ऑक्टोबरला होऊ शकतो.

2023 वर्ल्ड कपचे नवीन वेळापत्रक 2 किंवा 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाऊ शकते. अलीकडेच बीसीसीआय सचिव म्हणाले होते की, 2023 च्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारताच्या यजमानपदी खेळवला जाईल.

या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारताकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांची तात्पुरती वेळ सकाळी 10:30 आणि दुपारी 2:00 अशी ठेवण्यात आली आहे. विश्वचषक जवळ आल्याने सामन्यांच्या वेळेतही बदल केले जाऊ शकतात.

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 14 ऑक्टोबर, अहमदाबाद

  • भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड 22 ऑक्टोबर धर्मशाळा

  • भारत विरुद्ध इंग्लंड, 29ऑक्टोबर, लखनौ

  • भारत विरुद्ध नेदरलँड्स, 2नोव्हेंबर, मुंबई

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता

  • भारत विरुद्ध श्रीलंका, 11 नोव्हेंबर, बेंगळुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT