India Vs Pakistan Rahul Dravid Got Angry After Collide With Shoaib Akhtar In 2004 Champions Trophy esakal
क्रीडा

India Vs Pakistan : 'इंदिरा नगर का गुंडा' द्रविड जेव्हा शोएबच्या अंगावर धावून गेला होता

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Asia Cup 2022 : येत्या 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरूवात होत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या या आशिया कपमध्ये भारत आपला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध 28 ऑगस्टला खेळणार आहे. भारत - पाकिस्तान (India Vs Pakistan Rivalry) सामना म्हटलं की दोन्ही संघ त्वेषाने खेळतात. हा सामना दोन्ही देशांसाठी भावनिकतेचा मुद्दा असतो. या भावनेच्या भरात भारत आणि पाकिस्तान संघातील काही खेळाडू एकमेकांना भिडतात. असाच एक किस्सा शांत समजला जाणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यात 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान घडला. राहुल द्रविडचा रूद्रावतार पाहून शोएब अख्तर देखील आश्चर्य चकित झाला होता.

पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत शोएब अख्तर म्हणतो की, 'त्या सामन्यात आमच्या दोघांमध्ये धडक झाली होती. तो धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि आमच्या दोघांची टक्कर झाली. यावेळी राहुल द्रविड माझ्याजवळ येऊन मला काही तरी बोलणार होता. यापूर्वी मोहम्मद कैफ मी गोलंदाजी करण्यासाठी धावत येत होतो आणि अचानक तो स्ट्राईकवरून बाजूला झाला. मी त्याला काही बोललो नाही मात्र मी खूप चिडलो होते. त्यामुळे मी त्याला बाद केले. त्यानंतर युवराजला देखील बाद केले. आम्ही त्या सामन्यात विजयाच्या जवळ आलो होतो.'

शोएब अख्तरने पुढे राहुल द्रविड सोबत घडलेला किस्सा सांगितला, 'राहुल द्रविड माझ्याकडे धावत येत होता. आमच्या दोघांची धडक झाली. मी त्याला तू तुझ्या तुझ्या बाजूने धाव असे सांगितले. त्यावेळी राहुल द्रविडला राग आला आणि तो माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी मी त्याला म्हणालो की राहुल द्रविड आक्रमक झालाय? कसं काय? मला माहिती आहे की वातावरणात बदल होत आहे. मात्र मला तू देखील भांडू शकतोस हे माहिती नव्हते. राहुल द्रविडच्या बाबतीत घडलेली ही दुर्मिळ घटना होती. राहुल द्रविड एक जंटलमन आहे. मात्र मी तो स्पेल खूप वेगाने टाकला होता. मला 2003 च्या वर्ल्डकपनंतर भारताविरूद्ध चांगली कामगिरी करून दाखवायची होती.'

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 49.5 षटकात सर्वाबाद 200 धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने सर्वाधिक 67 धावा केल्या. शोएब अख्तरने त्या सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या. भारताने जरी 200 धावांचेच टार्गेट ठेवले असले तरी पाकिस्तानची देखील हे टार्गेट चेस करताना दमछाक झाली होती. अखेर त्यांनी हे टार्गेट 49.2 षटकात पार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT