Krunal-Pandya
Krunal-Pandya 
क्रीडा

भारताचा कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह; दुसरी टी२० पुढे ढकलली

विराज भागवत

- IND vs SL T20: दोन्ही संघ आयसोलेशनमध्ये; सूर्यकुमार, पृथ्वीचं टेन्शन वाढलं

कोलंबो: भारत (Team India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील टी२० मालिकेतीच (T20 Cricket Match Series) दुसरा सामना बुधवारी खेळण्यात येणार होता. परंतु पहिल्या सामन्यात खेळलेला भारताचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या (All Rounder Krunal Pandya) हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा सामना आता पुढे ढकलण्यात (Match Postponed) आला आहे. कृणाल पांड्याने कोविड चाचणी (Covid Test) केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला. त्यामुळे आता दोन्ही संघ विलगीकरणात आहेत. सर्व खेळाडूंची चाचणी जर निगेटिव्ह आली तर आजचा पुढे ढकलण्यात आलेला सामना उद्या खेळवला जाईल, अशी माहिती देण्यात येत आहे. (India vs Sri Lanka Krunal Pandya Tests Positive for COVID-19 Second T20I Postponed)

भारतीय संघाने वन डे मालिका जिंकल्यानंतर टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही सहज विजय मिळवला होता. भारताने यजमान श्रीलंकेला ३८ धावांनी धूळ चारली होती. या सामन्यात कृणाल पांड्यादेखील खेळला होता. कृणालने सामन्यात तीन धावा केल्या होत्या तर २ षटकांच्या गोलंदाजीत एक बळीदेखील पटकावला होता. कृणालने कोरोना चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्व खेळाडूंचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले तर आज नियोजित असलेली टी२० मॅच उद्या खेळवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

कृणाल पॉझिटिव्ह; सूर्यकुमार, पृथ्वीचं टेन्शन वाढलं

भारतीय संघ सध्या दोन आघाड्यांवर क्रिकेट खेळत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये आहे. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारताचा निर्धारित षटकांसाठीचा संघ श्रीलंकेत आहे. इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल या दोघांची निवड झाली होती. पण त्यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यांच्या जागी सध्या श्रीलंकेत असलेले सूर्यकुमार आणि पृथ्वी शॉ हे दोघे इंग्लंडसाठी लवकरच रवाना होणार आहेत. पण, कृणाल पांड्यासोबतच हे दोघेही पहिल्या टी२० सामन्यात खेळले होते. त्यामुळे आता त्यांचे कोरोना रिपोर्ट्स आणि प्रवासाचे प्लॅनिंग याबाबत BCCI काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT