India vs Zimbabwe 2022 First ODI Schedule Time captain KL Rahul sakal
क्रीडा

Ind vs Zim: कर्णधार केएल राहुलच्या कामगिरीवर लक्ष; सामना किती वाजता होणार सूरू

भारत-झिम्बाब्वे यांच्यामध्ये आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार

Kiran Mahanavar

Ind vs Zim : भारत-झिम्बाब्वे यांच्यामध्ये आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी भारतीय संघ व्यवस्थापनापासून क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वांचेच लक्ष दोन महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार के. एल. राहुलवर असणार आहे.

भारताच्या प्रमुख संघाचा कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे लक्ष राहुलच्या खेळावर असणार आहे. राहुलच्या बॅटमधून या मालिकेत किती धावा निघताहेत यासह तो कशा प्रकारे धावा करतो आहे, हे प्रकर्षाने पाहिले जाणार आहे. आशियाई करंडकाच्या पहिल्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. त्याआधी होणाऱ्या मालिकेत राहुल कशाप्रकारे फलंदाजी करतोय हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुखापत, कोरोना यावर मात करून मैदानात उतरणाऱ्या राहुलसाठी झिम्बाब्वेविरुद्धची मालिका आशियाई करंडक व टी-२० विश्‍वकरंडकासाठीची पात्रता फेरी असणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मालिकेमधून काय मिळणार
फ्लॉवर बंधू, मरे गुडविन, नील जॉन्सन, हीथ स्ट्रीक, हेन्री ओलोंगा यांसारख्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर झिम्बाब्वे संघाचा स्तर घसरला. या देशातील राजकीय परिस्थितीमुळेही तेथील क्रिकेटवर परिणाम झाला आहे. सध्याचा भारताचा झिम्बाब्वे दौरा हा यजमान देशाच्या क्रिकेट बोर्डासाठी आर्थिकदृष्ट्या बळ देणारा ठरणार आहे. या मालिकेतील टेलीव्हीजन व डिजिटल प्रक्षेपण हक्कांमधून मिळणाऱ्या निधीमुळे झिम्बाब्वेला मोठा फायदा होणार आहे. भारताच्या दृष्टीने पर्यायी खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी टीम इंडियाकडे असणार आहे.

चहर, कुलदीप, त्रिपाठीला संधी?
भुवनेश्‍वरकुमार याच्याकडे भारताचा टी-२० क्रिकेटमधील प्रमुख गोलंदाज म्हणून बघितले जाते. दीपक चहरही भुवीप्रमाणे चेंडूला स्विंग करण्यात माहीर आहे, पण महत्त्वाच्या स्पर्धांसाठी अंतिम अकरामध्ये निवड होण्यासाठी त्याला गोलंदाजीसह फलंदाजीतही ठसा उमटवावा लागणार आहे. कुलदीप यादव या फिरकीपटूनेही अखेरच्या काही सामन्यांमध्ये चमक दाखवली आहे. युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्‍नोई या फिरकीपटूंच्या रेलचेलमध्ये त्याला आपले नाणे खणखणीत वाजवावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीला या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अंतिम अकरामध्ये त्याला खेळायला मिळते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

भारत-झिम्बाब्वे पहिली एकदिवसीय लढत - दुपारी 12:45 पासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Muslim Population: भारत जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश बनणार; प्यू रिसर्चची धक्कादायक आकडेवारी

Jayant Patil Resign : शरद पवार गटाने अखेर भाकर फिरवली....जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, नवा प्रदेशाध्यक्षही ठरला!

लव्ह जिहाद प्रकरण : शान खानने नाव बदलून हिंदू मुलीशी केली मैत्री अन् 2 वर्षे ठेवले शारीरिक संबंध; आता लग्न करण्यास दिलाय नकार

आणि मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही... वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट

टेनिसपटू राधिका बाईकवर ज्याला चिटकून बसलीये तो इनामुल हक कोण? का झाली तिची हत्या, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT