Richa Ghosh Dhoni Style Stumping  esakal
क्रीडा

VIDEO | ENGW vs INDW : रिचा घोषचा 'धोनी स्टाईल' स्वॅग होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

India Women vs England Women : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात नुकताच पहिला टी 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताला इंग्लंडविरूद्ध 9 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला. इंग्लंडने पहिल्या सामन्यात भारताचा सहज पराभव केला. मात्र या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारताची विकेटकिपर रिचा घोषचा आहे. तिने इंग्लंडच्या फलंदाजाला धोनी स्टाईलने स्टम्पिंग केले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात सातव्या षटकात स्नेह राणाच्या दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडची फलंदाज डेनियल वॅटने स्टेप आऊट होऊन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्नेह राणाने चलाखीने चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. यामुळे डेनियलला फटका खेळता आला नाही. दरम्यान, विकेटकिपर रिचा घोषने चपळाई दाखवत लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पकडून क्षणार्धात बेल्स उडवल्या.

विशेष म्हणजे भारताने संपूर्ण सामन्यात इंग्लंडची ही एकमेव विकेट घेतली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने भारताचा 9 विकेट्नसी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या. इंग्लंडने हे आव्हान 13 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून दिप्ती शर्माने नाबाद 29 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून सोफिया डंक्लेने सर्वाधिक 61 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT