Rohit Sharma 
क्रीडा

Rohit Sharma : 'हिटमॅन'च्या नावावर लज्जास्पद विक्रम; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्मा सर्वाधिक वेळा....

Kiran Mahanavar

Rohit Sharma IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 49 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 20 षटकांत 228 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु टीम इंडिया 18.3 षटकांत केवळ 178 धावांवर आटोपली. भारताकडून दिनेश कार्तिकने 21 चेंडूत सर्वाधिक 46 धावांची खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या 227 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न करता कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतीय कर्णधार हा या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 वेळा एकही धाव न काढता कर्णधार म्हणून बाद झाला आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या तर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कर्णधार म्हणुन विराट कोहली 3 वेळा एकही धाव न काढता बाद झाला आहे. शिखर धवन कर्णधार म्हणून एकदा शून्यावर धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचा कर्णधार म्हणून 62 डावात फलंदाजी केली, पण तो कधीही शून्यावर बाद झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT