क्रीडा

'आधारस्तंभ गमावला', वडिलांच्या निधनानंतर पीयूष चावलाची पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारताचा (India) क्रिकेटपटू पीयूष चावलाचे (Piyush Chawla) वडील प्रमोद चावला (Pramod chawla) यांचे कोरोनामुळे (Covid 19) निधन झाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पीयूष चावलाने इन्स्टाग्रामवर वडिलांच्या निधनाची माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रमोद चावला यांना मुरादाबाद यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीला (Delhi) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. (indian cricketer piyush chawla father dies due to corona)

पीयूष चावलाने पोस्टमध्ये म्हटलं की,'मी माझा आधारस्तंभ गमावला आहे. आता त्यांच्याशिवाय आधीसारखं आयुष्य नसेल.'

पीयूष चावलाने इन्स्टाग्रामवर वडिलांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. त्याने म्हटलं की, तुमच्याशिवाय आता आयुष्य पहिल्यासारखं नसेल. आज मी माझी ताकद हरवली आहे.

पीयूष चावलाच्या वडिलांच्या निधानानंतर मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरूनही श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पीयूष चावला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबई इंडियन्सने म्हटलं की, 'आम्ही या कठीण काळात तुझ्यासह कुटुंबाच्या सोबत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT