Viral video 
क्रीडा

Viral video : सामना ऑस्ट्रेलियात अन् चर्चा भारतीय चाहत्याची, टी-20 मॅच सुरू असताना केलं गर्लफ्रेंडला प्रपोज अन्...

Kiran Mahanavar

Viral video : ऑस्ट्रेलियात आता सध्या बिग बॅश लीग (BBL) खेळल्या जात आहे, ज्यामध्ये भारत वगळता जगभरातील स्टार खेळाडू खेळत आहेत. 13व्या हंगामातील 23वा सामना मेलबर्न रेनेगेड्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात खेळला गेला. पण या सामन्यादरम्यान भारतीय चाहत्याची चर्चा अधिक झाली.

कारण एका भारतीय चाहत्याने आपल्या गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर मेलबर्न स्टार्स आणि रेनेगेड्स यांच्यात सामना रंगणार आहे. सामना सुरू असताना एक अँकर प्रेक्षकांना त्यांचे अनुभव विचारात असतो. यादरम्यान अँकर मॅचचा आनंद लुटणाऱ्या जोडप्यापर्यंत पोहोचतो.

जेव्हा अँकरने भारतीय व्यक्तीला काही विचारले तेव्हा तो म्हणतो की, होय, मी मेलबर्न स्टार्सचा खूप मोठा चाहता आहे. आणि ती रेनेगेड्सची फॅन आहे. पण आम्हा दोघांना ग्लेन मॅक्सवेल आवडतो. त्यामुळेच आम्ही येथे आलो आहोत.

यानंतर भारतीय व्यक्ती सीटवरून उठतो आणि अंगठी काढतो आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. मुलगी सुद्धा हो म्हणते आणि तिचा हात पुढे करते आणि भारतीय व्यक्ती तिला अंगठी घालायला लावतो.

हा व्हिडिओ 7क्रिकेटने त्याच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला 179.4 हजार व्ह्यूज मिळाले आहेत तर हजाराहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

एका व्यक्तीने लिहिले की, 'नवीन वर्षाची यापेक्षा चांगली सुरुवात कोणती असू शकते. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘किती गोड.’ सामन्यात मेलबर्न स्टार्सने मेलबर्न रेनेगेड्सचा 8 विकेट्सने पराभव केला. मॅक्सवेलने गोलंदाजीत एक बळी घेताना 15 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT