indian grandmaster aravindh chithambaram wins chess tournament in spain  SAKAL
क्रीडा

भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने स्पेनमधील बुद्धिबळ स्पर्धा जिंकली

Benasque open 2022 जिंकल्याबद्दल अरविंद चिदंबरमचे अभिनंदन!

सकाळ ऑनलाईन टीम

Chess Tournament In Spain : भारताचा ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने स्पेनमधील बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे.(indian grandmaster aravindh chithambaram wins chess tournament in spain)

भारताचा ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने 41 वी विला दे बेनास्क्यू आंतरारष्ट्रीय बुद्धीबळ ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याने अर्मानियाच्या रॉबर्ट होवहानिसयान आणि भारताच्याच रौनक साधवानी यांचा टाय ब्रेकरवर पराभव केला. चिदंबरम, रॉबर्ट आणि साधवानी हे इतर सात जाणांबरोबर दहाव्या फेरीनंतर 8 गुणांवर होते. माजी राष्ट्रीय विजेता चिदंबरमने टाय ब्रेकरवर सफाईदार पद्धतीने गुण मिळवल्यामुळे तो विजेता ठरला. तर रौनक साधवानी तिसऱ्या स्थानावर राहिला. अर्मानियाच्या रॉबर्ट होवहानिसयानला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अरविंद चिदंबरमने या स्पर्धेची सुरूवात सलग चार फेऱ्या जिंकून केली होती. त्यानंतर पुढच्या दोन फेरीत त्याला ड्रॉ वर समाधान मानावे लागले. याचबरोबर चिदंबरमला आठव्या फेरीत चेक रिपब्लिकच्या जीएम व्होजटेक प्लाट कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र त्यानंतर चिदंबरमने शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये जोरदार पुनरागमन करत स्पेनच्या मार्कोस लिआनेस ग्रासिया आणि अर्मानियाच्या ग्रँढ मास्टर कारेन यांच्यावर विजय मिळवला.

दुसरीकडे 17 वर्षाच्या रैनक साधवानी हा 10 फेऱ्यांपर्यंत अपराजीत राहिला. त्याने यातील सहा फेऱ्यात विजय मिळवला तर चार फेऱ्या ड्रॉ राहिल्या. टाय ब्रेकरमध्ये खेळातील सफाईदारपणात तो पिछाडीवर पडला. अरविंद चिदंबरम जिंकल्यानंतर त्याचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी 'विला दे बेनास्क्यू आंतरारष्ट्रीय बुद्धीबळ ओपन स्पर्धा जिंकल्याबद्दल अरविंद चिदंबरमचे अभिनंदन. याचबरोबर रौनक साधवानी याचेही अंतिम फेरीत संयुक्तरित्या पहिला आणि टाय ब्रेकमध्ये तिसरा आल्याबद्दल अभिनंदन.' अशा ट्विट करून शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT