Indian hockey team out of the Asia Cup title race after 4 - 4 Goal Equal against South Korea  esakal
क्रीडा

Asia Cup Hockey : भारत - द. कोरिया सामना बरोबरीत; फायनल गाठण्यात अपयश

अनिरुद्ध संकपाळ

जकार्ता : भारतीय हॉकी संघाने वेगवान खेळ करत सुपर फोर मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजयासाठी पराकाष्ठा केली. मात्र भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना 4 - 4 असा बरोबरीत राहिल्याने भारताला फायनल गाठण्यात अपयश आले. आजच्या दिवशी सुरूवातीला मलेशियाने जपानवर 5 - 0 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला फायनल गाठण्यासाठी दक्षिण कोरिया विरूद्धचा सामना जिंकणे गरजेचे होते. (Indian hockey team out of the Asia Cup title race after 4 - 4 Goal Equal against South Korea)

मलेशिया आणि कोरिया यांनी प्रत्येकी 5 गुण मिळवले. मात्र भारताला गोल फरकात बाजी मारण्यात अपयश आले. दक्षिण कोरियाविरूद्धच्या सामन्यात भारताकडून निलम संजीपने 9 व्या, दिपशान तिक्रीने 21 व्या, महेश शेशे गौडाने 22 व्या तर शक्तीवर मरीस्वरनने 37 व्या मिनिटाला गोल केले. तर दक्षिण कोरियाकडून जँग जोंगयून (13), जी वू चिऑन (18), किम जिंगहू (28) तर जूंग मांजाएने 44 व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत सोडवला.

दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यात झालेला सामना हा सुरूवातीपासूनच वेगावान झाला. दक्षिण कोरियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारतावर वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला होता. भारतानेही तोडीस तोड उत्तर दिले. मात्र अखेर दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी भारताची आघाडी फार काळ टिकू दिली नाही. आता आशिया कप हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात बुधवारी दक्षिण कोरिया मलेशियाला भिडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT