IND vs AUS 3rd Test India Collapse
IND vs AUS 3rd Test India Collapse  esakal
क्रीडा

IND vs AUS 3rd Test : लाल मातीच्या आखाड्यात टीम इंडियाचे पहिल्याच सत्रात टांगे पलटी घोडे फरार!

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 3rd Test : भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली. आता इंदूर कसोटी जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या तयारीत टीम इंडिया होती. यासाठी इंदूरची खेळपट्टी देखील फिरकीला साथ देणारी बनवली. सोने पे सुहागा म्हणजे रोहित शर्माने नाणेफेक देखील जिंकली. याचा अर्थ कांगारू चौथ्या डावात फलंदाजी करणार.

मात्र भारतीय चाहत्यांचा हा आनंद इथंपर्यंतच होता. कारण पहिल्याच सत्रात कांगारूंच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजीला अस्मान दाखवलं. लाल मातीच्या आखाड्यात भारतीय संघ आपल्याच रणनितीत अलगद अडकली.

तिसर्‍या कसोटीत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत 7 गडी गमावून 84 धावा केल्या होत्या.

मॅथ्यू कुहनमनने सेट होऊ पाहणाऱ्या भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (12), शुभमन गिल (21) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.यानंतर नॅथन लायनने चेतेश्वर पुजाराचा (1) डिफेन्स भेदला. तर रविंद्र जडेजा (4) बढती देऊन धावगती वाढवण्याचा भारताचा मनसुबा देखील उधळून लावला. मॅथ्यूने श्रेयस अय्यरला (0) बाद करून भारताला 5 वा धक्का दिला.

विराट कोहलीने काही काळ एक टोक राखले पण टॉड मर्फीने त्याला पॅव्हेलियनमध्ये एलबीडब्ल्यू पाठवले. कोहलीने 52 चेंडूत 22 धावा केल्या.

डावाच्या 25 व्या षटकात भारताला सातवा धक्का बसला. श्रीकर भरत 30 चेंडूत 17 धावांची खेळी करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. लिऑनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भरतने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला.

सध्या रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आहेत.

भारताची उपहारानंतर 8 बाद 88 धावा अशी अवस्था झाली असताना आजच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी संधी मिळालेल्या उमेश यादवने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने शंभरी पार करून देत भारताची लाज वाचवली. त्याने 12 चेंडूत 17 धावा केल्या.

मात्र कूहमनने यादवची शिकार करत भारताला 9 वा धक्का देत आपली पाचवी शिकार देखील केली. यानंतर सिराज शुन्यावर बाद झाला अन् भारताचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कूहमनने 16 धावात भारताचा निम्मा संघ गारद केला. तर लयॉनने 35 धावात 3 अन् टॉड मर्फीने 1 बळी टिपला.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT