ishan kishan hardik pandya axar patel funny viral video sakal
क्रीडा

टीम इंडिया रमली लहानपणीच्या आठवणीत, खेळत आहेत 'चिमणी उड...'

हार्दिकच्या सोबत टीम इंडियाचे प्लेअर्स खेळत आहेत 'चिमणी उड कावळा उड'

Kiran Mahanavar

Viral Video: आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करत 2-0 असा विजय मिळवला. भारताचे अनेक खेळाडू इंग्लंडमध्येच थांबले आहेत. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि स्टार सलामीवीर ईशान किशन चिडिया उड, कावळा उड खेळताना दिसत आहेत.(ishan kishan hardik pandya axar patel funny viral video)

'चिडिया उड, कावळा उड' हा खेळ आपण सर्वांनीच खेळला आहे. आता भारतीय खेळाडू चिडिया उड, कावळा उड वाला खेळत आहेत. या व्हिडिओमध्ये स्टार सलामीवीर ईशान किशन, आयर्लंड दौऱ्यावर संघाला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या आणि जादूई फिरकी गोलंदाज अक्षर पटेल खेळत आहे. खेळाला सुरुवात होताच अक्षर पटेल काही वेळातच पकडला गेला. यानंतर तिघेही हसायला लागतात.

ईशान किशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अक्षर पटेल मैना उडवर थांबतो. त्यावर हार्दिक पांड्याने विचारले की मैना म्हणजे काय? यावर अक्षर पटेल म्हणतो की ती मोराची बहीण आहे. यानंतर तिघेही हसत बसतात. हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या तिन्ही खेळाडूंनी भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंड दौऱ्यावर मालिका २-० ने जिंकली. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकले आहे. त्याचवेळी इशान किशनने जबरदस्त खेळ दाखवला. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत असे दिग्गज खेळाडू नव्हते, जे सध्या इंग्लंडमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT